Food | फ्लॉवर की ब्रोकोली? जाणून घ्या कोणती भाजी आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर…

सध्या भाजी मार्केटमध्ये, फ्लॉवर आणि ब्रोकोलीमध्ये या दोन पौष्टिक भाज्या नक्कीच सापडतील. या दोघांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आहे आणि दोघेही अँटी-ऑक्सिडेंट आणि इतर पौष्टिक घटकांनी समृद्ध आहेत.

Food | फ्लॉवर की ब्रोकोली? जाणून घ्या कोणती भाजी आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर...
फ्लॉवर आणि ब्रोकोली
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 6:06 PM

मुंबई : निरोगी आहार खाल तर, निरोगी राहाल हे ऐकले की बालपणातील अनेक आठवणी ताज्यातवान्या होतात! भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत, हे आपल्याला वेळोवेळी समजावले जात असत. सध्या भाजी मार्केटमध्ये, फ्लॉवर आणि ब्रोकोलीमध्ये या दोन पौष्टिक भाज्या नक्कीच सापडतील. या दोघांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आहे आणि दोघेही अँटी-ऑक्सिडेंट आणि इतर पौष्टिक घटकांनी समृद्ध आहेत (cauliflower or broccoli which vegetable is more healthy).

दोन्ही भाज्या एकसारख्या दिसतात आणि दोघांचे फायदे आश्चर्यकारक आहेत, तरीही त्यांच्यात बरेच फरक आहेत. दोन्हीचे रंगदेखील भिन्न आहेत. या दोघांमधील फरक जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या आहारात या दोन्ही पौष्टिक भाज्यांचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे.

पौष्टिक घटक आणि फरक

फ्लॉवर आणि ब्रोकोली दोन्ही पौष्टिक भाज्या आहेत, हे नाकारता येत नाही. दोघांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आहे. तसेच, दोघांमध्येही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी आरोग्यासाठी चांगली असतात. इतर भाज्यांच्या तुलनेत त्यामध्ये फायबर आणि व्हिटामिन सी जास्त असते. फायबर पाचन तंत्राची देखभाल करण्याबरोबरच, शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकते. व्हिटामिन सी संक्रमणाशी लढते, रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते, आणि आपल्या त्वचेला चमकण्यात महत्वाची भूमिका निभावते. या सर्व व्यतिरिक्त, दोन्ही भाज्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅंगनीजसह बरेच मॅक्रो आणि मायक्रो पोषक घटक असतात.

एक वाटी फ्लॉवरमधील पोषक घटक

कॅलरी : 27

कार्बोहायड्रेट : 5.5 ग्रॅम

फायबर : 2 ग्रॅम

प्रथिने : 2 ग्रॅम

व्हिटामिन सी : 57% आरडीए

व्हिटामिन बी -6 : 14% आरडीए

फोलेट : 15% आरडीए

व्हिटॅमिन ई : 1% आरडीए

एक कप ब्रोकोलीमधील पोषक घटक

कॅलरी : 31

कार्बोहायड्रेट : 6 ग्रॅम

फायबर : 2.5 ग्रॅम

प्रथिने : 2.5 ग्रॅम

व्हिटामिन सी : 90% आरडीए

व्हिटामिन बी-6 : 9% आरडीए

फोलेट : 14% आरडीए

व्हिटामिन ई : 3% आरडीए

(cauliflower or broccoli which vegetable is more healthy)

दोघांमध्ये इतरही फरक आहेत. ब्रोकोलीमध्ये फ्लॉवरपेक्षा व्हिटामिन सी आणि व्हिटामिन केचे प्रमाण जास्त असते. परंतु, तरीही या दोन्ही भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. फ्लॉवर ही अनेकांची आवडती भाजी आहे. कारण त्यात कार्बोहायड्रेटचे गुणधर्म खूप कमी आहेत. पिझ्झा क्रस्टपासून ते पुलाव अशा विविध प्रकारच्या डिश फ्लॉवरपासून बनवळे जातात.

अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध

अँटी-ऑक्सिडेंट घटक वयाचा प्रभाव कमी करण्यास आणि शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. जर आपल्याला आपल्या आहारामध्ये अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध घटक समाविष्ट करायचे असतील, तर ब्रोकोलीपेक्षा काहीही चांगले नाही. याच्या सेवनामुळे दाह कमी होतो, रक्तातील साखरेची पातळी कमी होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते. त्याचप्रमाणे फ्लॉवरमध्ये देखील शक्तिशाली आणि मजबूत अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे पेशींचे कार्य मजबूत करतात.

कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

यावर अद्याप संशोधन सुरू आहे. परंतु, काही तज्ज्ञांचे मत आहे की, या दोन भाज्यांचा वापर केल्यामुळे काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. यात ओव्हेरिअन, पोट, कोलोरेक्टल आणि प्रोस्टेट कर्करोगाचा समावेश आहे.

कोणती भाजी सर्वात निरोगी?

फ्लॉवर आणि ब्रोकोली या दोन्हीचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. कोणती भाजी सर्वात निरोगी हे सांगणे कठीण होईल. दोन्ही आपल्या आहारासाठी आवश्यक आहेत आणि पोषण प्रदान करतात. आपल्यासाठी कोणती भाजी योग्य आहे, हे आपल्या प्राधान्यावर अवलंबून आहे.

(cauliflower or broccoli which vegetable is more healthy)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.