रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही आणि ताक ठरेल सुपरफूड!

दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दह्यामध्ये आणि ताकामध्ये अनेक पोषक घटक असतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:30 AM, 13 Apr 2021
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही आणि ताक ठरेल सुपरफूड!

मुंबई : दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दह्यामध्ये आणि ताकामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज आहारात याचा समावेश केल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दह्यामध्ये आणि ताकामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. मात्र, इतकेच नसून दही आणि ताकामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Curd and buttermilk superfoods to boost the immune system)

दररोज एक वाटी दही आणि एक ग्लास ताक पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. दही आणि ताकाच सेवन करणे हे सध्याचा परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरोना रूग्णांची संख्या आपल्याकडे झपाट्याने आवडत आहे आणि यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक झाले आहे. म्हणून सर्वांनी आपल्या आहारामध्ये दही आणि ताकाचा समावेश करावा.

दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात. दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.ताक पचनासाठी अत्यंत हलके असते.

ताकामुळे पचनाचे असलेले सर्व विकार दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपली पचनप्रक्रिया चांगली आणि सुरळीत होण्यास मदत देखील होते. ताक पिल्ल्याने आपली त्वचा देखील चांगली होते. तसेच चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास नक्की मदत होईल. जर तुम्हाला अपचना संदर्भातील काही समस्या असतील तर तुम्ही आहारामध्ये रोज ताक घ्या यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.

आजकाल सर्वाना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात.

संबंधित बातम्या : 

(Curd and buttermilk superfoods to boost the immune system)