Benefits of Drumstick : आरोग्यवर्धक ‘शेवगा’ अनेक रोगांवर रामबाण उपाय, वाचा अधिक !

आपण जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो. निरोगी आयुष्यासाठी आणि रोग्यांपसून दूर राहण्यासाठी भाज्या खाणे फायदेशीर आहे.

Benefits of Drumstick : आरोग्यवर्धक ‘शेवगा’ अनेक रोगांवर रामबाण उपाय, वाचा अधिक !
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 12:16 PM

मुंबई : आपण जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो. निरोगी आयुष्यासाठी आणि रोग्यांपासून दूर राहण्यासाठी भाज्या खाणे फायदेशीर आहे. त्यामध्येही शेवग्याची शेंग अशी भाजी आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. आयुर्वेदात देखील शेवग्याला खूप जास्त महत्त्व आहे. बऱ्याच आैषधामध्ये शेवग्याचा वापर केला जातो. (Eating drumstick is extremely beneficial for your health)

शेवग्याच्या शेंगेमधील पोषण घटक-  शेवग्यामध्ये बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्याला हंगामी संक्रमणापासून वाचवतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटामिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखे पोषक घटक असतात. चला तर, या शेवग्याच्या शेंगेपासून होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.

पोटाशी संबंधित समस्यांसाठी- पोटाशी संबंधित समस्यांसाठी आपण शेवग्याच्या शेंगा खाऊ शकतो. हे सेवन केल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. हे पोटाच्या समस्येवर अत्यंत फायदेशीर आहे.

लठ्ठपणा- वाढते वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या भाजीचे सेवन करणे अतिशय लाभदायी ठरते. यात लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत जे वाढते वजन कमी करण्यात मदत करू शकतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण – रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपण शेवग्याचा शेंगा खाऊ शकतो. शेवग्याचा शेंगा घेतल्यास मधुमेह आणि हृदयरोग इत्यादींचा त्रास दूर होतो. म्हणून, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आपण शेवग्याचा शेंगा देखील घेऊ शकता.

केसांसाठी- शेवग्याच्या फुलांचे सेवन केल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. नियमित सेवन केल्यास केस वाढतात. तुम्ही शेवग्याच्या फुलांचा चहा घेऊ शकता. यामुळे केस चमकदार बनतात.

हाडे- हेपेटोप्रोटोक्टिव्ह हा असा घटक आहे ज्यामुळे शरीरात अँटी ऑक्सिडंट तयार होतात. तसेच, शेवग्याच्या भाजीत ऑस्टिओपोरोटिक गुणधर्म आहेत जे ऑस्टिओपोरोसिसच्या धोक्यापासून आपल्या शरीराचा बचाव करण्यास मदत करतात

अँटीसेप्टिक- शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते. स्टोनची समस्या – बरेच लोक मूत्रपिंडाच्या समस्येमुळे अस्वस्थ असतात. अशा परिस्थितीत शेवग्याच्या शेंगाचा सूप किंवा भाजी खाणे फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Eating drumstick is extremely beneficial for your health)

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.