उन्हाळ्यात ‘किवी’ खाल्ल्याने राहाल निरोगी आणि तंदुरुस्त !

उन्हाळा म्हणले की, आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:49 AM, 6 Apr 2021
उन्हाळ्यात ‘किवी’ खाल्ल्याने राहाल निरोगी आणि तंदुरुस्त !
किवी

मुंबई : उन्हाळा म्हणले की, आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते. अनेक फळे खाऊन आपणाला उकाड्यापासून आराम मिळवता येतो. पण ते फळ किती आरोग्यदायी आहे हे आपण आधी जाणून घ्यायला हवे. उन्हाळ्याचा हंगामात त्वचेची आणि शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याच्या हंगामात किवी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. (Eating kiwi in summer is beneficial for health)

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा दुप्पट आहे. व्हिटामिन सी व्यतिरिक्त व्हिटामिन के, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि आहारातील फायबर देखील किवीमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त किवी अँटि-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे. म्हणून केवळ प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीच नाहीतर, तर एकूण आरोग्यासाठी देखील किवी खूप फायदेशीर आहे.

-गर्भवती महिलांसाठी किवीचे सेवन देखील फायदेशीर मानले जाते. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. शरीरात लोहाची कमतरता दूर करण्याबरोबरच गर्भपात होण्याचा धोकाही कमी होतो.

-बर्‍याच संशोधनात असे दिसून आले आहे की किवी सतत आठ आठवड्यांपर्यंत खाल्ल्यास हाय बीपीच्या समस्येवर नियंत्रण मिळते. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम उच्च बीपीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

-किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मोठ्या प्रमाणात असतात. किवी त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

-रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी तुम्ही एक किवी खाल्ली तर आरोग्यासाठी चांगले असते.

-किवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात.

-किवी आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. यांना याचा त्रास आहे अशांनी तर किवी खाणे फायदेशीर आहे.

-लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असल्याच किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Eating kiwi in summer is beneficial for health)