बटाटा खाल्ल्याने होईल कॅन्सरचा धोका कमी ! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

बटाटा ही जवळपास सगळ्यांची आवडती भाजी आहे. बटाटा चवीसाठी चांगला आहे पण त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. बटाट्याचे सालीसोबत सेवन केल्यास अनेक आजार दूर राहतात.

बटाटा खाल्ल्याने होईल कॅन्सरचा धोका कमी ! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 4:14 PM

आता काही दिवसांपासून थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडी म्हटलं की थंडी पाठोपाठ अनेक आजारही येतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते. थंडीमध्ये काही सामान्य आजार शरीराला अस्वस्थ करू लागतात. या काळात आपल्या जीवनशैलीत काळजीपूर्वक बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात अनेक भाज्या आणि फळे उपलब्ध असतात. पण आपण त्याचे अनेक भाग नकळत फेकून देतो. त्यातीलच एक म्हणजे बटाटा. बटाट्याच्या सालीमध्ये अशा अनेक गोष्टी आढळतात. ज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

जवळपास प्रत्येक घरात वापरला जाणारा बटाटा या थंडीमध्ये खूप फायदेशीर आणि गुणकारी ठरणार आहे. बटाटा हा प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. बटाटा अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. बटाटा अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. आता प्रश्न असा आहे की बटाटा सालीसोबत सेवन केल्याने त्याचे जास्त फायदे होतात की साल काढून सेवन केल्याने फायदे होतात.

बटाटा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

बटाट्यामध्ये आढळणारे फायदेशीर घटक हे त्याच्या सालीमध्येच असतात. साल काढून बटाट्याचे सेवन केले तर त्याचे मिळणारे फायदे मिळत नाहीत. बटाटा हा उष्ण असतो. त्यामुळे त्याचे थंडीत सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे होतात.

बटाटा खाण्याचे फायदे

कर्करोग होण्याचा धोका कमी : बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई, क्लोरोजेनिक ॲसिड, कॅफेरॉल, आणि गॅलिक ॲसिड असते. ज्यामुळे भविष्यात कर्करोगाचा धोका कमी होतो. याशिवाय बटाट्याच्या सालीसह सेवन केल्याने शरीरात होणारे अनेक आजार दूर होतात.

हाडे मजबूत होतात : यामध्ये मॅग्नेशियम,फॉस्फरस, कॅल्शियम, लोह,पोटॅशियम, तांबे आणि जस्त यासारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

हृदयासाठी फायदेशीर : बटाट्याच्या सालीमध्ये पोटॅशियम आढळते. जे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या अनेक परिस्थितीची शक्यता कमी करण्यास मदत करते.

त्वचेसाठी फायदेशीर : बटाट्याच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट, फिनोलिक आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करण्याची क्षमता असते.ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर होण्यासोबत डागही नाहीसे होतात.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.