सतत भात-खिचडी खाताय? अतिरेकामुळे होणारे नुकसान जाणून घ्या…

कोणती गोष्ट किती प्रमाणात पोटात घ्यावी याला काही मर्यादा असते. एखाद्या गोष्टीचे अतिसेवन हानिकारक ठरु शकते. तांदळपासून बनणारा भात किंवा खिचडीदेखील जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्यातून शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते. कोणत्याही घटकाचे ठराविक मर्यादेत सेवन केल्यास त्याचे शरीराला फायदे मिळत असतात.

सतत भात-खिचडी खाताय? अतिरेकामुळे होणारे नुकसान जाणून घ्या...
Rice (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:18 PM

मुंबई : आपल्या रोजच्या आहारात (Diet) एकदा तरी भात किंवा खिचडीचा (Rice) समावेश असतोच. अनेकांना पोळीच्या जेवणाऐवजी केवळ भात किंवा खिचडी आवडत असते. खिचडी बनवताना वेळाची आणि श्रमाची बचत होत असते. त्यामुळे अनेक वेळा गृहिणींकडून रात्रीच्या जेवणात हमखास खिचडीचेच नियोजन केले जात असते. अनेक घरांमध्ये तर रात्रीची उरलेली खिचडीदेखील सकाळी गरम करुन नाश्‍त्याला खातात. परंतु भात किंवा खिचडीचा अतिरेक केल्यास हे शरीराला अनेक अंगाने हानीकारक ठरत असते. देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे भात हे मुख्य अन्न म्हणून खाल्ले जाते. या राज्यांतील लोकांच्या आहारात मोठ्या प्रमाणात तांदळाचा वापर आवडीने केला जात असतो. तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते शरीराला अपायकारक (side effects) ठरु शकते.

वजन वाढते

भात किंवा खिचडीच्या अतिसेवनामुळे वजन वाढून लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. अनेकदा वजन कमी करण्यासाठी भात-खिचडीचे सेवन कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. तांदळामध्ये कॅलरीज्‌ जास्त प्रमाणात असतात. त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे वजन वाढत असते. वजन वाढल्यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब आदी व्याधीदेखील जडत असतात. त्यामुळे एका ठराविक मर्यादेत भाताचे सेवन करावे.

पोटाचा घेर वाढतो

आहारात सतत भात-खिचडी खाल्ल्याने पोटाचा घेर वाढण्याची शक्यता असते. पोळीच्या तुलनेत भाताने लवकर पोट भरत असले तरी ते तात्पुरते असते. भात लगेच जिरतो. त्यामुळे पोट रिकामं झाल्यावर पुन्हा सतत काहीतरी खावेसे वाटत असते. यामुळे अपचनसारख्या व्याधींना सामोरे जावे लागत असते. शिवाय भात-खिचडीचे सेवन केल्यानंतर लगेच झोपू नये याचा शरीरावर घातक परिणाम होत असतो.

मधुमेहींनी भात टाळावा

भातामध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात त्याच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. अशात मधुमेहाचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे ज्यांना आधीच मधुमेहाची समस्या आहे, अशा लोकांनी भाताचे ठराविक प्रमाणात सेवन केल्यास ते अधिक चांगले राहील.

मुतखड्याची समस्या

कच्चा भात खाल्ल्यास अशा लोकांना मुतखड्याची समस्या निर्माण होउ शकतो. सोबतच शिजवलेला भात सतत खाल्ल्यासही मुतखड्याची समस्या निर्माण होत असते. भात योग्य प्रकारे शिजवला नाही, तर कॅन्सरचा धोकाही असतो, त्यामुळे थोड्या प्रमाणात व शिजवलेला भात खावा.

इतर बातम्या

वेळीच सावध व्हा, अन्यथा या पाच सवयींनी खंगून जाईल संपूर्ण शरीर…

Exercise : व्यायाम करत आहात? मग या खास टिप्स फाॅलो करा आणि फिट राहा!

योगा केल्यानंतर कसा असावा डाएट? जाणून घ्या सविस्तर माहिती…

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.