Ganesh Chaturthi Special Recipe : गणेश चतुर्थीसाठी खास घरी तयार करा रवा-नारळाचे लाडू, पाहा रेसिपी!

प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सवाची मोठी धूम बघायला मिळत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. यावर्षी गणेश चतुर्थी 2021 चा उत्सव आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. असे मानले जाते की गणपती घरात येतो आणि तेथील सर्व दुःख दूर करतो.

Ganesh Chaturthi Special Recipe : गणेश चतुर्थीसाठी खास घरी तयार करा रवा-नारळाचे लाडू, पाहा रेसिपी!
नारळ-रवा लाडू

मुंबई : प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सवाची मोठी धूम बघायला मिळत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. यावर्षी गणेश चतुर्थी 2021 चा उत्सव आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. असे मानले जाते की गणपती घरात येतो आणि तेथील सर्व दुःख दूर करतो. गणपतीला मोदक आणि लाडू खूप प्रिय आहेत. गणपतीसाठी तुम्ही रवा-नारळाचे लाडू तुम्ही घरी तयार करू शकता. पाहा खास रेसिपी (Ganesh Chaturthi Recipe 2021 Rava coconut ladoo special recipe)

साहित्य: 400 ग्रॅम रवा, 200 ग्रॅम नारळाची पूड, 1/2 कप मनुका, आवश्यकतेनुसार गरम दूध, 200 ग्रॅम तूप.

पद्धत

-सर्वप्रथम कढईत तूप टाकून सुकामेवा तळून घ्या. यामुळे ते लवकर खराब होणार नाहीत. यानंतर, सर्व तूप एका पॅनमध्ये ठेवा आणि रवा घालून मंद आचेवर भाजा. भाजण्याचा सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा आणि रवा एका प्लेटमध्ये काढून घ्या. लक्षात ठेवा की रवा फक्त भाजला पाहिजे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही.

-आता त्याच कढईत नारळाची पूड टाका आणि हलके भाजून घ्या कारण नारळ फार लवकर खराब होण्याची शक्यता असते. सर्व गोष्टी थंड झाल्यावर सर्व गोष्टी मिक्स करा. थोडी नारळाची पूड बाजूला ठेवा.

-यानंतर, थोडे दूध घालून, हे मिश्रण चांगले मिक्स करा आणि गुळगुळीत चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर छोटे-छोटे गोळे करून त्याचे लाडू तयार करा.

-सर्व लाडू बनल्यावर त्यावर नारळाचा खिस वरून टाका. रवा-नारळाचे लाडू तयार आहेत. आता हे लाडू गणपतीसमोर ठेवा आणि पूजेनंतर ते प्रसाद म्हणून सर्वांना वाटून द्या.

संबंधित बातम्या : 

Ganesh Chaturthi 2021 : चतुर्थीला चंद्र दिसल्यानंतर भगवान श्रीकृष्णांवरही लागला होता चोरीचा आरोप

Ganesh Chaturthi 2021 Aarti | गणपतीची आरती पाठ झाली का? बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी वाचा या तीन आरत्या

(Ganesh Chaturthi Recipe 2021 Rava coconut ladoo special recipe)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI