कॅलरी काउंट करताना समस्या आहे?, तर मग या टिप्स फाॅलो करा

आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

कॅलरी काउंट करताना समस्या आहे?, तर मग या टिप्स फाॅलो करा
वजन मोजताय?
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 10:46 AM

मुंबई : आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात खाणे. आपण एका दिवसात किती कॅलरी खाता? हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर मग तुम्ही कॅलरी काउंट करणे अतिशय महत्वाचे आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला कॅलरी कशी कमी करायची याच्या टिप्स देणार आहोत. (Having trouble counting calories while losing weight then follow these tips)

-आपल्याला कॅलरी कमी करायची असेल तर स्वतः अन्न शिजवा आणि त्या गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये कॅलरीची संख्या कमी आहे. यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही. असे म्हटले आहे की, जे लोक स्वतःचे अन्न शिजवतात ते कमी कॅलरी घेतात.

-जेव्हा आपण कॅलरी काउंट करायला सुरूवात करतो त्यावेळी अन्नाचे प्रमाण विसरायला नको. बर्‍याच लोकांना किती आहार घ्यावा हे समजत नाही आणि शेवटी ते अधिक कॅलरी घेतात. आपण शक्यतो कमी अन्न खाल्ले पाहिजे जेणे करून कॅलरीचे प्रमाण योग्य राहिल.

-अनेकांना सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोणत्याही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. पण यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते.

– ‘खाने के बाद, कुछ मीठा हो जाये’ असे अनेकदा म्हटलं जातं. आपण सर्वजण सहसा जेवणानंतर गोड पदार्थ खातो. मात्र यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी वाढतात. यामुळे तुमचे वजन वाढते.

-हिरव्या भाज्या खा. त्यामध्ये मेथी, पालक, भेंडी हे जास्त खा. मिठाई आणि मद्यपान मर्यादित प्रमाणात घ्या.

-शक्यतो आहारामध्ये साखर आणि तांदळाचे खाद्यपदार्थ टाळा. दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्याला तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका. प्रत्येक निश्चित वेळी थोडेसे पाणी प्या. असे केल्याने अति खाण्याच्या सवयीवरही परिणाम होईल.

संबंधित बातम्या : 

Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!

Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

(Having trouble counting calories while losing weight then follow these tips)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.