Nutrition Tips : ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करा!

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु त्यासोबत शरीराच्या गरजाही बदलतात. म्हणूनच यादरम्यान आपण आपल्या आहारामध्ये काही पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे.

Nutrition Tips : 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 11:18 AM

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु त्यासोबत शरीराच्या गरजाही बदलतात. म्हणूनच यादरम्यान आपण आपल्या आहारामध्ये काही पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे. तसेच काही पदार्थ पूर्णपणे खाणे बंद केले पाहिजेत. आपण आहारामध्ये काय खातो, यावर सर्व काही अवलंबून आहे. यामुळे आपण आपल्या आहारामध्ये नेहमी पौष्टिक पदार्थच घेतले पाहिजेत.

अंडी

अंडी कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या आहारामध्ये असले पाहिजे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंडी असणे गरजेचे आहे. दररोज सकाळी दोन उकडलेले अंडे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपली त्वचा चांगली होण्यास मदत मिळते.

सीफूड

लाल मांसामध्ये भरपूर फॅट असते. पण हे अन्न चरबी बर्न करण्यासही मदत करते. चिकनमध्ये व्हिटॅमिन K2 आणि कोलेजन असते, जे शरीरासाठी चांगले असते. कोळंबीसारखे सीफूड हे केवळ प्रथिनांचे चांगले स्त्रोत नाही तर त्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील असतात जे दाहक-विरोधी असतात. यामुळे यापदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा.

लोणी आणि खोबरेल तेल

तूप, लोणी आणि खोबरेल तेलामध्ये चांगले फॅट्स असतात. जे आवश्यक सेल्युलर राखण्यास मदत करतात, ज्याची तुमच्या शरीराला वयानुसार गरज असते. हे फॅट्स तुमची त्वचा उजळ करण्यास मदत करतात. ज्यामुळे आपल्या त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या पडत नाहीत.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. ते हाडांशी संबंधित रोग दूर करण्यास देखील मदत करतात. हा व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे, जो हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतो. याशिवाय, ब्रोकोलीमध्ये फॉस्फरस आणि इतर जीवनसत्त्वे देखील असतात. जी निरोगी हाडांसाठी आवश्यक असतात. यामुळे ब्रोकोलीचा देखील दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.