Food | गुळाचे अधिक सेवन आरोग्यासाठी अतिशय लाभदायक!

निरोगी राहण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्न करत असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका घरगुती औषधाबद्दल सांगणार आहोत.

Food | गुळाचे अधिक सेवन आरोग्यासाठी अतिशय लाभदायक!
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 11:28 AM

मुंबई : निरोगी राहण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्न करत असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका घरगुती औषधाबद्दल सांगणार आहोत. जे केवळ आपले आरोग्यासाठीच चांगले ठेवत नाही तर तुम्हाला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवते. आपल्या सर्वाच्याच स्वंयपाक घरात गुळ असते मात्र, तुम्हाला या गुळाचे फायदे माहिती आहे का? एवढेच नव्हे तर गुळाचे पाणीही खूप फायदेशीर मानले जाते. (Jaggery is beneficial for health)

बरेच लोक रोजच्या पदार्थांत साखरेऐवजी गुळ वापरतात. गुळाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.

जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरेऐवजी गुळ घालून प्यावे, हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते.आपल्याला जर वारंवार गॅस किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या होत असेल तर, गुळाच्या सेवनाने फायदा होईल.

त्याच वेळी, गूळ, मीठ आणि काळे मीठ एकत्र मिसळून खाल्ल्यास करपट ढेकारांपासून मुक्तता मिळेल. गुळ हा लोहाचा उत्तम स्रोत असल्याने शारीरिक अशक्तपणा कमी होतो. जर, शरीरात हिमोग्लोबिनची कमी असेल तर, दररोज गुळ खाल्ल्यास त्वरित फायदा होईल. गूळ खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…

कापूराचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत? वाचा…

(Jaggery is beneficial for health)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.