घरच्या-घरी तयार करा ‘हे’ स्वादिष्ट पनीर कॉकटेल, जाणून घ्या खास रेसिपी!

पनीर जवळपास सगळ्यांनाच खायला आवडते. पनीर अनेक प्रकार बनवले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी पनीरची अशीच एक खास डिश घेऊन आलो आहोत, जी तुम्हाला खूप आवडेल. ही स्वादिष्ट पनीर डिश बनवायला फक्त सोपी नाही तर कॅलरीजमध्येही खूप कमी आहे.

घरच्या-घरी तयार करा 'हे' स्वादिष्ट पनीर कॉकटेल, जाणून घ्या खास रेसिपी!
पनीर कॉकटेल
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 8:41 AM

मुंबई : पनीर जवळपास सगळ्यांनाच खायला आवडते. पनीर अनेक प्रकार बनवले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी पनीरची अशीच एक खास डिश घेऊन आलो आहोत, जी तुम्हाला खूप आवडेल. ही स्वादिष्ट पनीर डिश बनवायला फक्त सोपी नाही तर कॅलरीजमध्येही खूप कमी आहे. पनीर, कैरी पावडर आणि काही अस्सल भारतीय मसाल्यांच्या मदतीने पनीर कॉकटेल घरी तयार करता येते. चला तर जाणून घेऊयात ही खास रेसिपी.

पनीर कॉकटेलचे साहित्य

250 ग्रॅम पनीर

1 कप मैदा

आवश्यकतेनुसार मीठ

1 टीस्पून अजवाईन

2 चमचे कैरी पावडर

2 टीस्पून मिरची पावडर

3 चमचे तेल

पनीर कॉकटेल कसे बनवायचे?

स्टेप 1-

पनीर 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर चॉपिंग बोर्ड घ्या आणि पनीरचे चौकोनी तुकडे करा.

स्टेप 2-

आता पनीरचे तुकडे मॅरीनेट करण्यासाठी एक मध्यम आकाराचे भांडे घ्या आणि त्यात पीठ आणि आवश्यकतेनुसार मीठ आणि थोडे पाणी घाला. आता ते चांगले मिसळा. दुसऱ्या भांड्यात कैरी पावडर, अजवाईन बिया, तिखट आणि उरलेले मीठ टाका आणि हे बाजूला ठेवा.

स्टेप 3-

एक कढई घेऊन त्यात तेल टाका. तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर पनीरचे तुकडे कढईत टाकून तळून घ्या.

स्टेप 4-

पनीर तळून झाल्यावर स्कीवर ठेवून पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

हे देखील महत्वाचे-

डिश अधिक मसालेदार बनवण्यासाठी तुम्ही थोडी लाल तिखट किंवा काळी मिरी पावडर घालू शकता. तुम्ही आले आणि लसूण पेस्टने पनीर मॅरीनेट करू शकता. शेवटी, डिश अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही मॅरीनेडमध्ये काही चिरलेली कोथिंबीर घालू शकता.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.