Weight Loss Tips | केवळ एक कप कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त? जाणून घ्या…

आपल्यापैकी अनेक लोकांना त्यांचा दिवस एक कप कॉफी (Coffee) पिऊन सुरु करायला आवडतो. परंतु काही लोक असा देखील विचार करतात की, कॉफीच्या सेवनाने आपले वाज वाढेल आणि आपण लठ्ठ होऊ.. म्हणून आवडत असूनही लोक कॉफी पिणे टाळतात.

Weight Loss Tips | केवळ एक कप कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त? जाणून घ्या...
Coffee
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 8:00 AM

मुंबई : आपल्यापैकी अनेक लोकांना त्यांचा दिवस एक कप कॉफी (Coffee) पिऊन सुरु करायला आवडतो. परंतु काही लोक असा देखील विचार करतात की, कॉफीच्या सेवनाने आपले वाज वाढेल आणि आपण लठ्ठ होऊ.. म्हणून आवडत असूनही लोक कॉफी पिणे टाळतात. मात्र, तुम्ही पण कॉफी लव्हर असून, असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. तुमची आवडती कॉफी तुमचे वजन वाढवणार नाही तर, चक्क ते कमी करण्यात मदत करेल…

काही सोपे आणि उत्कृष्ट हॅक तुमच्या कॉफीच्या कपला केवळ वजन कमी करणाऱ्या पेयात बदलणार नाहीत, तर तुमच्या कॉफीची चव आणि त्यातील आरोग्यदायी गुणधर्म देखील वाढवतील. चला तर मग जाणून घेऊया…

  1. जायफळ कॉफी

जायफळ हा आणखी एक सौम्य पण अतिशय गुणकारी मसाला आहे, जो कॉफीची चव आणि आरोग्यदायी फायदे वाढवू शकतो. हे कॉम्बिनेशन फारसे सामान्य नसले तरी वजनाच विचार करणाऱ्यांसाठी ही कॉफी उत्तम आहे. कारण जायफळात भरपूर मॅंगनीज असते जे, चरबी नष्ट करण्यास मदत करते आणि आहारातील फायबर चांगले असते, जे जलद वजन कमी करण्यास मदत करते. तर, मग तुम्ही वजनाची चिंता सोडून बिनधास्त जायफळ कॉफी पिऊ शकता.

  1. डार्क लेमन कॉफी

या कॉफी ट्रेंडने तिच्या परिणामांसह इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. एस्प्रेसो शॉट आणि लिंबूसह ही साधी कॉफी काही मिनिटांतच बनवता येते. एस्प्रेसोचा एक गरम कप तयार करा आणि त्यात लिंबाचा रस घाला. लिंबू व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिडमध्ये समृद्ध आहे, जे चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच, चयापचय गतिमान करते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढते. कॅफिन ऊर्जा पातळी वाढवते आणि एक उत्तम प्री-वर्कआउट पेय बनते.

  1. बटर किंवा खोबरेल तेल

जर तुम्ही केटो डाएट घेत असाल, तर तुम्ही या फॅड कॉफीच्या ट्रेंडबद्दल ऐकले असेल, ज्याला बुलेट कॉफी देखील म्हणतात. यात मिडीयम-चेन ट्रायग्लिसराइड्स (MCTs) जसे की, अनसाल्टेड बटर किंवा व्हर्जिन कोकोनट ऑईल, कॉफीमध्ये मिसळले जाते. जे कॉफीमधील कॅलरी वाढवते आणि समाधान देते, तसेच जलद वजन कमी करण्यास मदत करते. मुख्यतः संपूर्ण जेवणाला पर्याय म्हणून या कॉफीला प्राधान्य दिले जाते.

  1. डार्क चॉकलेट

वजन कमी करण्यासाठी आणि कॉफीला उत्तम पेय बनवण्यासाठी हा एक स्वादिष्ट पण आरोग्यदायी मार्ग आहे. डार्क चॉकलेट किंवा गोड नसलेला कोको हे अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. त्याच वेळी, कॅफिन आणि डार्क चॉकलेटचे मिश्रण वजन कमी करण्यास मदत करते. साध्या कॉफी मिक्समध्ये डार्क चॉकलेट टाकल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, ते डार्क चॉकलेट कडवट असेल याची खात्री करा.

  1. दालचिनी

एक कप गरम कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी टाकल्याने, या सौम्य-गोड मसाल्यामुळे कॉफीची चव आणि समृद्धता तर वाढतेच, पण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत होते. ज्यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते. ही कॉफी चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच, हृदय देखील निरोगी ठेवते. यासाठी कॉफीमध्ये एक चमचे दालचिनी घाला किंवा दालचिनीची काडी पाण्यात उकळा आणि नंतर कॉफीच्या ग्राउंडमध्ये घाला. हे संयोजन चयापचय वाढवून वजन जलद कमी करण्यास मदत करेल.

(टीप : कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Flaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…

सतत ओटीपोटात दुखणे असू शकते यकृत खराब होण्याचे लक्षण! अशी घ्या स्वतःची काळजी…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.