सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती? वाचा!

निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:45 AM, 6 Apr 2021
सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती? वाचा!
नाश्ता

मुंबई : निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर न्याहारी केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. (What is the best time to have breakfast in the morning)

सकाळी आठ ते दहा ही वेळ नाश्ता करणासाठी योग्य वेळ आहे. सकाळी उठल्यावर दिवसभराच्या धावपळीसाठी, शारीरिक हालचालींची कामं करण्यासाठी आपल्याला प्रचंड ऊर्जेची गरज असते. आपला सकाळचा नाश्ता त्यासाठी आवश्यक ऊर्जा शरीरात निर्माण करत असतो. रात्री दीर्घकाळ काही न खाल्ल्याने किंवा उपाशी राहिल्याने थकवा जाणवतो. त्यामुळेच सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे गरजेचे आहे.

नाश्त्यामध्ये नेमके घटक असावेत?

सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कबरेदके इत्यादी घटकांचा समावेश असावा.

– आपल्या आहारात तंतू असणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आजारांना लांब ठेवण्यासाठीही गरजेचं आहे.

-अंडी, मासे, दूध इत्यादी पदार्थात प्रथिनं असतात. उकडलेलं अंड किंवा अंडयातील चरबी नसलेले पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता.

-धान्यातून आणि संपूर्ण धान्याच्या ब्रेडमधूनही संमिश्र कार्बोदके मिळतात. त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळते.

-आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचे आहेत. पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी पिण्याचे फार महत्त्व आहेत. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

(What is the best time to have breakfast in the morning)

हेही वाचा :

डेंटल इम्प्लांट्स केल्यानंतर ‘हे’ पदार्थ खाताय? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतायत…

स्ट्रॉबेरी खाणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !

उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा !

(What is the best time to have breakfast in the morning)