‘या’ सवयींमुळे तुमची हाडे होऊ शकतात ठिसूळ, वेळीच सावध व्हा…

सकस आहाराची कमतरता, मिठाचे अतिरिक्त सेवन, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे आदी अनेक कारणांमुळे आपली हाडे ठिसूळ होण्याचा धोका निर्माण होत असतो. आपण वेळीच या सवयींना बदलले नाही तर, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात...

'या' सवयींमुळे तुमची हाडे होऊ शकतात ठिसूळ, वेळीच सावध व्हा...
ठिसूळ हाडे/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:12 AM

अजानतेपणे आपल्या अशा अनेक सवयी कमी-अधिक प्रमाणात आपल्या शरीरावर परिणाम करीत असतात. वाढत्या वयानुसार त्याची लक्षणे आपणास दिसत असतात. वेळीच या सवयी बदलल्या नाहीत तर, याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. जसेजसे आपले वय वाढते तसतसे आपल्याला हाडांच्या संबंधित अनेक समस्या सतावत असतात. गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी आदी दुखणे हे वय वाढले की आपोआप डोकावत असते. परंतु या सर्व व्याधी आपला आधीचा आहार, क्रीयाकलाप आदींशी निगडीत आहे.

होतात हाडे कमकुवत

चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, जीवनपद्धती आदींचा परिपाक म्हणून आपणास वाढत्या वयासोबत हाडांशी (bones) संबंधित विविध व्याधींना सामोरे जावे लागत असते. अनेक वेळा म्हातारपणी तज्ज्ञांकडून कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देण्यात येत असतो. कॅल्शियम हे दात (Teeth) व हाडांच्या मजबूतीचे काम करीत असते. रोजच्या आहारातून त्याची कमतरता भरुन निघत नसल्यास कृत्रिमरित्या ती भरुन काढण्यासाठी तज्ज्ञांकडून कॅल्शियमच्या (Calcium) गोळ्यांसह पूरक आहार घेण्याचा सल्ला देण्यात येत असतो. अशा अनेक सवयी (habits) आपल्याला जडलेल्या असतात ज्यांचा आरोग्यावर कुठेतरी वाईट परिणाम होत असतो. अनेकदा काही सवयींमुळे हाडे कमकुवत होतात. आज आपण अशाच काही सवयींबद्दल माहिती देणार आहोत, जाणून घ्या…

1) मिठाचा जास्त वापर

रोजच्या आहारातील मिठ हा अविभाज्य घटक आहे. मिठामुळे अन्नाची चव वाढवते, पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने हाडे कमकुवत होऊ लागतात. यासोबतच कॅल्शियमची कमतरता असते त्यामुळेच हाडे आणखी कमकुवत होतात. रोजच्या आहारात कमीत कमी मिठाचा वापर हवा, तसेच वाढत्या वयासोबत हाडांची झीज लवकर होत असते. त्यामुळे कॅल्शियमयुक्त आहाराचा अवलंब करावा.

2) सकस आहाराचा अभाव

धावपळीच्या जगात सकस आहाराकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असते. आपण अशा आहाराला आपल्या दिनचर्येचा भाग बनवतो, ज्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते आणि त्यामुळे हाडांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. बदलत्या जीवनशैलीत आजकाल लोकांना ‘जंक फूड’ खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे होणारे नुकसान माहीत असूनही ते त्यांचे सेवन करतात. जेवनात पुरेसे जीवनसत्व नसल्यास हाडांसह इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे समतोल आहार घ्यावा

3) उभे राहून पाणी पिणे

आपल्यातील अनेकांना सर्रासपणे उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. आपल्याला उभे राहून पाणी पिणे व बसून पाणी पिणे यातील फरक समजत नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते जे लोक अनेकदा उभे राहून पाणी पितात, त्यांना हाडे दुखणे किंवा अशक्तपणाची तक्रार होऊ लागते. असे म्हणतात की बसून पाणी पिण्याव्यतिरिक्त ते सिप-सिप करून प्यावे, ते आरोग्यासाठी अधिक लाभदायक असते.

4) ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता

अनेक वेळा कामाच्या व्यापात व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना पुरेसा सूर्यप्रकाश अंगावर घेणे शक्य होत नाही. त्यासोबत जे लोक सतत घरात किंवा बंद खोलीत असतात, त्यांनाही उन्हाच्या अभावामुळे ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता जाणवत असते. सूर्यप्रकाशापासून मिळणारे ‘व्हिटॅमिन डी’ हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कोरोना काळात अनेकांना घरातून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी त्यांना हाडांसंबधी व्याधी जडल्या.

5) धूम्रपान

धूम्रपानामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावरच नाही तर हाडांवरही वाईट परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, धूम्रपानामुळे हाडांची झीज वाढते. यासोबतच सिगारेट किंवा इतर गोष्टींचे सेवन केल्याने हार्मोनल असंतुलनाची समस्या देखील होते, या सर्वांचा परिणाम हाडांवरदेखील होत असतो.

वाढत्या वयाबरोबर शरीर आरोग्याबाबत हे संकेत देतं, वेळीच आहाराकडे लक्ष द्या…

फायद्यांसोबतच लसणाचे नुकसानही आहेत, तुम्हाला माहितीये का..?

तिळाच्या चिक्कीचे सहा फायदे ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त, हिवाळ्यात ऊर्जेचा स्त्रोत

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.