Immunity booster grapes : अशक्तपणा, कॅन्सरवर प्रभावी द्राक्षे, जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे

द्राक्षातील कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल यासारखे अनेक पोषक घटक शरीरात फायदेशीर ठरतात. (Know the amazing benefits of grapes, effective for anemia, Cancer)

Immunity booster grapes : अशक्तपणा, कॅन्सरवर प्रभावी द्राक्षे, जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
अशक्तपणा, कॅसरवर प्रभावी द्राक्षे, जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे

नवी दिल्ली : आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक फळाचे स्वतंत्र महत्व आहे. प्रत्येक हंगामात उपलब्ध फळांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरु आहे. उन्हाळ्यात द्राक्षांचा हंगाम असतो. द्राक्षांचे शरीरासाठी अनेक लाभदायी फायदे आहेत. द्राक्षांचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. द्राक्षांमध्ये पोषक तत्वांचा खजिना आहे. द्राक्षांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी सोबतच भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. फ्लेव्होनोइड्स द्राक्षांमध्ये आढळणारा सर्वात शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट घटक आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. तसेच द्राक्षातील कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल यासारखे अनेक पोषक घटक शरीरात फायदेशीर ठरतात. (Know the amazing benefits of grapes, effective for anemia, Cancer)

द्राक्षांचे फायदे

ब्रेस्ट कँसर रोखण्याशाठी फायदेशीर

एका संशोधनानुसार हृदयरोग, कँसर सारख्या आजारात द्राक्षे लाभदायी मानले जातात.

डोळ्यांसाठी लाभदायी

द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे त्यांनी द्राक्षांचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकते.

मधुमेहासाठी फायदेशीर

मधुमेहग्रस्त लोकांनी द्राक्षाचे सेवन केले पाहिजे. हे शरीरातील शुगर लेवल कमी करण्याचे काम करते. याशिवाय यात लोहाचे प्रमाणही अधिक असते.

अॅलर्जीसाठी गुणकारी

काही लोकांना त्वचेसंबंधी अॅलर्जीची समस्या असते. द्राक्षामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे त्वचेशी संबंधित अॅलर्जीपासून मुक्त होण्यास मदत करतात. पोलिओ, विषाणू आणि नागीण सारख्या विषाणूंचा सामना करण्यास मदत करते.

कँसरपासून बचाव करते

द्राक्षात ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि साइट्रिक अॅसिड सारखे अनेक घटक असतात. टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये प्रामुख्याने द्राक्षे फायदेशीर ठरतात. द्राक्षे कर्करोगासारख्या धोकादायक आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. (Know the amazing benefits of grapes, effective for anemia, Cancer)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

इतर बातम्या

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

सहारनपूरमधून खुणावतोय हिमालयाच्या पर्वतरांगांचा नजारा; मनमोहक फोटो सोशल मीडियात व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI