Healthcare : कांद्याची साल टाकून देण्याआधी वाचा हे फायदे, केसांच्या काळजीसह आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण

कांद्याचे अनेक फायदे आपण जाणतो, पण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विटामिन ए, सी, ई पुरवण्यासह कांद्याच्या सालीचे अनेक फायदे आहेत.

Healthcare : कांद्याची साल टाकून देण्याआधी वाचा हे फायदे, केसांच्या काळजीसह आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण
कांद्याच्या सालीचे फायदे

मुंबई : खाद्यपदार्थांमध्ये चव आणण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. पण चवीसह कांदा आरोग्यासाठी बराच फायदेशीर असल्याचे सर्वांनाच माहित आहे. पण कांद्याप्रमाणे त्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. कांद्याची साल केसांच्या काळजीसह आरोग्यालाही खूप फायदेशीर आहे. आपण शक्यतो कांदा सोलल्यानंतर त्याची साल ही फेकूनच देतो, पण कांद्याच्या सालीचे अनेक फायदे असल्याने यापुढे कांद्याची साल फेकून देण्याआधी हे फायदे नक्की वाचा. (Lifestyle tips Benefits Of Onion Peel For Good Hairs)

कांद्याची साल अनेक समस्यांपासून तुमची सुटका करु शकेल. कांद्याच्या सालीचा उपयोग चहा, झाडांना खत, हेअर डाय आणि टॉनिक तयार करण्यासाठी वापरु शकता. कांद्याच्या सालीमध्ये विटामिन ए, सी, ई, अँटी ऑक्सीडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असे अनेक महत्त्वाचे घटक असतात.

हेयर डाय म्हणून वापर

तुम्हाला कांद्याची साल गळणारे केस आणि सफेद केसांच्या समस्येपासून वाचवू शकते. त्यासाठी तुम्हाला 4 ते 5 कांद्याच्या सालीना एका पॅनमध्ये टाकावे लागेल. सोबत 2 कप पाणी टाकून उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर पाणी गाळून घेऊन थंड झाल्यानंतर ते पाणी केसांच्या मूळाशी लावावे. त्यानंतर 1 ते 2 तासानंतर शॅम्पूने धुऊन घ्यावे. तुम्ही हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून वापरु शकता. असे करण्याने केस गळणे थांबेलच सोबतच डँड्रफपासून ही सुटका मिळेल.

नैसर्गिक हेअर कलर

जर तुम्हाला रासायनिक हेअर कलरच्या जागी नैसर्गिकरितीने हेअर कलर करायचे असल्यास कांद्याची साल उपयोगी आहे. यासाठी एका पॅनमध्ये साली आणि पाणी टाकून एक तासापर्यंत उकळून घ्या आणि रात्रभर थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर सकाळी हे मिश्रण हेअर कलरप्रमाणए केसांवर लावून 30 मिनिटानंतर शॅम्पूने धुऊन घ्या.

घशाच्या खवखवीपासूनही सुटका

जर तुम्हाला सर्दीमुळे घशात खवखव होत असेल तर देखील कांद्याची पात तुमच्यासाठी उपयोगी आहे. खवखव दूर करण्यासाठी कांद्याची साल पाण्यात टाकून मिश्रण उकळून घ्या. त्यानंतर थोडं कोमट झाल्यानंतर गारगल करुन घ्या. यासोबतच चहा तयार करताना देखील कांद्याच्या साली वापरु शकता. यामुळे घशाच्या खवखवीपासून सुटका मिळेल.

हे ही वाचा :

Health Tips | गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! कमकुवत होऊ शकते रोग प्रतिकारक शक्ती!

सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

(Lifestyle tips Benefits Of Onion Peel For Good Hairs)