Cancer | कर्करोगाचा उपचार करणे सोपे होणार, 300 वर्षांत पहिल्यांदाच मानवी शरीरात नव्या ग्रंथींचा शोध!

300 वर्षात प्रथमच मानवी शरीरात (Human Body) ही नवीन ग्रंथी आढळल्याचा दावा केला जात आहे.

Cancer | कर्करोगाचा उपचार करणे सोपे होणार, 300 वर्षांत पहिल्यांदाच मानवी शरीरात नव्या ग्रंथींचा शोध!
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 4:00 PM

मुंबई : नेदरलँड्समधील वैज्ञानिकांनी प्रोटेस्ट कर्करोगाच्या संशोधनादरम्यान, घशातील नवीन लाळ ग्रंथींचा (Salivary Glands) शोध लावला आहे. 300 वर्षात प्रथमच मानवी शरीरात (Human Body) ही नवीन ग्रंथी आढळल्याचा दावा केला जात आहे. यामुळे कर्करोगाच्या उपचारांदरम्यान बराच फायदा होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या नवीन ग्रंथींच्या सेटची सरासरी लांबी 1.5 इंच आहे. हे नासॉफिरिंजियल भागात म्हणजेच नाकाच्या मागे आणि घशाच्या वरच्या बाजूस आढळतात. अॅमॅस्टरडॅममधील नेदरलँड्स कर्करोग संस्थेच्या संशोधकांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, डोके व मानेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांना रेडिओथेरपीच्या वेळी होणारा त्रास यामुळे कमी होऊ शकतो.( Netherland scientists discovered new salivary glands throat in human body)

ओपन अॅक्सेस जर्नल, रेडिओथेरपी आणि ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका पत्रात संशोधकांनी लिहिले आहे की, ‘मानवी शरीरात यापूर्वी शोध न लागलेल्या आणि मॅक्रोस्कोपिक लाळ ग्रंथी अस्तित्वात आहेत. ज्याला ट्यूबरियल ग्रंथीं असे देखील म्हटले जाते. रेडिओथेरपी घेणार्‍या रूग्णांमध्ये या ग्रंथी वाढवून त्यांचे आरोग्य सुधारण्याची संधी मिळू शकते. ”

300 वर्षात नवीन लाळ ग्रंथींचा हा पहिला शोध

अहवालानुसार, लाळ ग्रंथींचा हा खरोखरच एक मोठा मोठा समूह आहे, याची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन करणे आवश्यक आहे. मात्र, याची पुष्टी झाल्यास, सुमारे 300 वर्षांत नवीन लाळ ग्रंथींचा हा पहिला शोध असणार आहे. (Netherland scientists discovered new salivary glands throat in human body)

लाळ ग्रंथींचा अचानक शोध

या नवीन लाळ ग्रंथींना ट्यूबरियल लाळ ग्रंथींचाच एक प्रकार आहे, असे म्हटले जाते. कारण या कार्टिलेजच्या जवळील भागात म्हणजेच टोरस ट्यूबरिअस जवळ या ग्रंथी आढळतात. संशोधक-अभ्यासक प्रोस्टेट कर्करोगाचा अभ्यास करत असताना अचानक या नव्या लाळ ग्रंथींचा शोध लागला आहे.

आम्हीही आश्चर्यचकित झालो!

रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट राउटर वोगेल यांनी म्हटले की, ‘मानवी शरीरात लाळ ग्रंथींचे केवळ तीन संच आहेत, परंतु ते टोरस ट्यूबरिअस जवळ आढळत नाहीत. आमच्या माहितीनुसार, नासॉफिरीनॅक्समधील एकमेव लाळ किंवा श्लेष्म ग्रंथी अतिशय सूक्ष्म प्रमाणात अस्तित्त्वात आहेत. आणि या ग्रंथी म्युकस प्रमाणे पसरतात. त्यामुळे इतक्या वर्षात पहिल्यांदाच अचानक समोर आलेल्या या नवीन लाळ ग्रंथीँमुळे आम्ही देखील आश्चर्यचकित झालो आहोत.’

(Netherland scientists discovered new salivary glands throat in human body)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.