प्लास्टिकपेक्षाही पेपर स्ट्रॉचे शरीरावर घातक परिणाम!

प्लास्टिक बंद झाल्यापासून मॅकडोन्ल्ड, डॉमिनॉज, रस्त्यावरच्या सरबत विक्रेत्यांनी कागदी स्ट्रॉ वापरणे सुरु केलेत. पण प्लास्टिक स्ट्रॉप्रमाणे पेपर स्ट्रामुळेही तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.

प्लास्टिकपेक्षाही पेपर स्ट्रॉचे शरीरावर घातक परिणाम!

मुंबई : सरकारने प्लास्टिक बंदी केल्यानंतर बाजारातून प्लास्टिकच्या पिशव्यांपासून स्ट्रापर्यंत सर्व वस्तू दिसेनाशा झाल्यात. या सर्व वस्तूंची जागा कागदी वस्तूंनीही घेतली आहे. त्यामुळे आता बाजारात सर्रास कागदी पिशव्या, प्लेट्स, ग्लास, स्ट्रा या सर्व वस्तू विकताना दिसतात. प्लास्टिक बंद झाल्यापासून मॅकडोन्ल्ड, डॉमिनॉजपासून अगदी रस्त्यावरच्या सरबत विक्रेत्यांनी कागदी स्ट्रॉ वापरणे सुरु केलेत. पण प्लास्टिक स्ट्रॉपेक्षा पेपर स्ट्रामुळेही तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शरीर हायड्रेट राहण्यासाठी दिवसभर आपण कोल्ड ड्रिंक्स, सरबत पितो. प्लास्टिक हे शरीराला घातक असल्याने अनेकजण सरबत पिण्यासाठी पेपर स्ट्रॉचा वापर करतात. पण या पेपर स्ट्रामुळेही तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

पेपर स्ट्रॉची सुरुवात

प्लास्टिक वापरावर मर्यादा आल्यानंतर अनेकांनी पेपर स्ट्राचा वापरण्यास सुरुवात केली. अमेरिकेच्या मार्विन चेस्टरने 1988 मध्ये पेपर स्ट्रॉची निर्मिती केली. त्यानंतर अल्पावधीत पेपर स्ट्रॉला लोकांची पसंती मिळाली. मात्र याचे दुष्परिणाम समजल्यानंतर अनेकांनी पेपर स्ट्रॉचा वापर करणे बंद केले आणि त्यानंतर प्लास्टिक स्ट्रॉची मागणी बाजारात वाढू लागली.

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र प्लास्टिक बंदी लागू केली आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर स्ट्रॉची मागणी वाढू लागली आहे. पेपरपासून तयार करण्यात आलेले हे स्ट्रा इको फ्रेंडली असतात. मात्र कागदापासून तयार करण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूंचे जवळपास 3 ते 6 आठवड्यात विघटन (decompose) करावे लागते.

‘या’ कारणांमुळे पेपर स्ट्रॉ शरीरासाठी घातक

पेपर स्ट्रा हे कागदापासून बनतो आणि कागदाची निर्मितीही लाकडापासून होते. बाजारात उपलब्ध असणारे पेपर स्ट्रा हे विविध रंगात, आकारात उपलब्ध असतात. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगात केमिकल असते. हे केमिकल आपल्या शरीरासाठी फार घातक असते.

दरम्यान प्लास्टिक किंवा पेपरच्या स्ट्रॉ वापरण्यापेक्षा तुम्ही धातूंनी बनवलेले स्ट्रॉचा वापर करु शकता. आता अनेक शहरातील हॉटेलमध्ये फळांच्या सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्ससोबत धातूंचे स्ट्रॉ दिले जातात. अशाप्रकारे धातूंचे स्ट्रॉ वापरल्यानंतर तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *