सर्वेक्षण : तरुणांना सेल्फीटीस आजारानं ग्रासलं

नागपूर: तुमच्या घरात किशोरवयीन मुलं-मुली असतील, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण मोबाईल आणि इंटरनेटच्या अती वापरामुळे तुमच्या मुलांची भावनिक अस्थिरता वाढलेली असू शकते, याचा तुमच्या मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नागपुरातील महिला महाविद्यालयाच्या संशोधनात हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. दर अर्ध्या तासाला मोबाईल चेक करणारी मुलं घरोघरी दिसतात. पालकांच्या व्यस्ततेमुळे […]

सर्वेक्षण : तरुणांना सेल्फीटीस आजारानं ग्रासलं
व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फीचर 'स्टोरेज अँड डेटा' च्या या पर्यायाच्या खाली 'स्टोरेज मॅनेज' अशा पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. यासाठी एक नवीन स्टोरेज बार तयार करण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नागपूर: तुमच्या घरात किशोरवयीन मुलं-मुली असतील, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण मोबाईल आणि इंटरनेटच्या अती वापरामुळे तुमच्या मुलांची भावनिक अस्थिरता वाढलेली असू शकते, याचा तुमच्या मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नागपुरातील महिला महाविद्यालयाच्या संशोधनात हे धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.

दर अर्ध्या तासाला मोबाईल चेक करणारी मुलं घरोघरी दिसतात. पालकांच्या व्यस्ततेमुळे घरी संवाद खुंटला, त्यामुळेच जास्तीत जास्त वेळ ही मुलं आपल्या मोबाईलला देत आहेत. किशोरवयीन मुलं असणाऱ्यांच्या घराघरात हीच कहाणी आहे. यावरच संशोधन करण्यासाठी नागपुरातील महिला महाविद्यालयानं एक सर्वेक्षण केलं. 15 ते 19 वयोगटातील मुलांचं त्यांनी सर्वेक्षण केलं. नागपुरात केलेल्या या सर्वेक्षणात 66 टक्के मुलांमध्ये अत्यंत भावनिक अस्थिरता आढळून आली, तर 52 टक्के मुलींमध्ये अत्यंत भावनिक अस्थिरता आढळून आल्याचं, डॉ. संपदा नासेरी यांनी सांगितलं.

नागपुरातील महिला महाविद्यालयाने आतापर्यंत 500 पेक्षा जास्त किशोरवयीन मुलांचं सॅम्पल सर्वेक्षण केलं. यापैकी नुकताच त्यांनी 200 पेक्षा जास्त सॅप्मल्सचा अहवाल प्रकाशित केला. मुलांमध्ये झपाट्याने भावनिक अस्थिरता वाढत असून ही चिंतेची बाब आहे, असं त्यांनी सांगितलं.

नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसेही वेगवेळ्या शाळा-कॉलेजेसमध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापराबाबत अभ्यास करतात. त्यांनी केलेल्या अभ्यासातही यापेक्षा जास्त चिंताजनक बाब पुढे आली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे सेल्फीटीस नावाच्या नव्या मानसिक आजाराला मोठ्या प्रमाणात तरुणाई बळी पडत असल्याचं ते सांगतात. एका तरुणाने दिवसाला तीन सेल्फी काढल्या पण त्या पोस्ट केल्या नाहीत, तर हे सेल्फीटीस आजाराचं लक्षण असल्याचं सायबर तज्ज्ञाचं मत आहे.

 इंटरनेट आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये भावनिक अस्थिरतेची तीव्रता किती आहे, याबाबत महिला महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

सर्वेक्षणातील निष्कर्ष

भावनिक स्थिती       मुलं (टक्के)      मुली (टक्के)

अत्यंत अस्थिर        ६६.३४            ५२.१२

अस्थिर                    १८.७५            २२.३४

अत्यंत परिपक्व        १०.४१            १८.८

साधारण परिपक्व       ४.५५             ७.४६

या सर्वेक्षणानुसार 59 टक्के मुला-मुलींमध्ये भावनिक अस्थिरता दिसून येत आहे. हे झालं नागपूरच्या काही भागापुरतं सर्वेक्षण. पण ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं-मुली आहेत, ते किती वेळ मोबाईल आणि इंटरनेटचा वापरकरतात, आणि त्यांची भावनिक स्थिती काय आहे, हे प्रत्येक पालकांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पालकांनी सावध व्हायला हवं, आणि मोबाईलचा मर्यादित वापर सुरु करुन घरात खुंटलेला संवाद पुन्हा सुरु करण्याची आज खरी गरज आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.