गुगलवर लैंगिक जीवन – सेक्सबाबत हे 10 मोठे प्रश्न का विचारले जात आहेत?

सेक्सबाबत फायदे आणि तोटे याबाबत नेहमी गुगलवर सर्च केलं जात आहे. गुगलवर असे काही प्रश्न आहेत जे सर्वाधिक सर्च केले जात आहेत. Sex Life on Google

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:59 PM, 19 Apr 2021
गुगलवर लैंगिक जीवन - सेक्सबाबत हे 10 मोठे प्रश्न का विचारले जात आहेत?
Establishes a relationship during intercourse

मुंबई : चांगले लैंगिक संबंध किंवा सेक्सबाबत (Sex Life) अपुरी माहिती अनेकवेळा आनंदापासून दूर ठेवते. याबाबत तुम्ही जेवढे जागरुक असाल, तेवढा तुम्हाला आनंद सर्वाधिक मिळू शकतो. सेक्सबाबत फायदे आणि तोटे याबाबत नेहमी गुगलवर सर्च केलं जात आहे. गुगलवर असे काही प्रश्न आहेत जे सर्वाधिक सर्च केले जात आहेत. (Sex Life on Google – Why are these 10 big questions being asked about sex?)

1) सेक्समुळे आनंद का मिळतो?

गुगलवर अनेक लोकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या उत्तरात सांगण्यात आलं की, एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करतो, तेव्हा त्याला मानसिकदृष्ट्या दिलासा मिळतो. हार्मोन्स किंवा संप्रेरके स्त्रवल्याने एक वेगळाच आनंद मिळतो.

2) सेक्सबाबत पडणारी स्वप्न सामान्य आहेत का?

गुगलवर हा प्रश्नही सातत्याने विचारला जातो. गुगलवर याचं उत्तर होय असं मिळतं. जर तुमच्या मनात सेक्सची भावना असेल, तर ती मिळवण्याची इच्छा आणखी तीव्र होते. मनोवैज्ञानिकांच्या मते, आपली स्वप्न आपल्या इच्छांवर आधारित असतात. त्यामुळे सेक्सबाबत विचार करणं किंवा स्वप्न पडणं सामान्य आहे.

3) STD झाल्यावर काय करावं ?

STD म्हणजेच सेक्सुअल ट्रांसमिशन डिसीज अर्थात लैंगिक संसर्ग रोग हे प्रकृतीसाठी हानिकारक आहे. जर तुमच्या सेक्स ऑर्गनजवळ खाज, जळजळ होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

4) सेक्स टायमिंग कसा वाढवावा?

हा प्रश्नही गुगल सर्चच्या टॉप लिस्टमध्ये आहे. लोकांनी विचारलेल्या प्रश्नावर गुगलने उत्तर दिलं आहे. ज्यांना शीघ्रपतनाचा त्रास आहे, त्यांनी काही सराव करणे आवश्यक आहे. शीघ्रपतनाच्या 20-30 सेकंदपूर्वी स्वत:ला उत्तेजित होण्यापासून रोखा. लैंगिक संबंधादरम्यान डॉक्टर नेहमीच हा सल्ला देतात.

5) किती वेळा सेक्स करायला हवा?

गुगलवर अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं. त्यावर गुगलने आपलं उत्तर नोंदवलं. त्यानुसार, कपल्सना कितीवेळा सेक्स करायला हवा याची निश्चित अशी संख्या, किंवा परिमाण नाही. हे सर्व संबंधित जोडप्याच्या कम्फर्ट, प्रेम आणि समजुतीवर अवलंबून आहे. काही लोक दिवसातून दोन-तीन वेळा सेक्स करतात तर काही जण महिन्यातून दोन-तीनवेळा.. मात्र त्यावरुन त्यांच्या प्रेमाची व्याख्या करणे योग्य नाही.

6) सेक्स करताना वेदना का होतात?

या प्रश्नाचं उत्तर देताना गुगल म्हणतं, “जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्स केला असेल, तेव्हा तुम्हाला थोड्या वेदना जरुर झाल्या असतील. मात्र महिलांचा प्रायव्हेट पार्ट जोपर्यंत स्त्रवत नाही, तोपर्यंत वेदना होतात. त्यामुळे फोर प्लेचा आधार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

7) प्रेग्नंन्सी रोखण्यासाठी प्रोटेक्शन किती आवश्यक

गुगलच्या मते, हे आवश्यक आहे. अनेक गर्भनिरोधक गोळ्या आहेत, ज्या प्रेग्नन्सी रोखण्यासाठी मदतगार ठरतात. याशिवाय निरोध किंवा कंडोम हे सेक्सदरम्यान सुरक्षित पर्याय मानला जातो.

8) डॉक्टरांच्या सल्ल्याविना असं करणं धोकादायक

काही लोक आपलं लैंगिक जीवन अर्थात सेक्स लाईफ उत्तम करण्यासाठीही प्रयत्न करतात. ते केवळ लाईफस्टाईलच बदलतात असं नाही, तर महागडी औषधं आणि खास प्रोडक्टचंही सेवन करतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याविना हे करणं धोकादायक आहे.

9) चांगल्या लैंगिक जीवनासाठी या गोष्टी आवश्यक

चांगल्या लैंगिक जीवनासाठी योग्य जीवनशैली, चांगला व्यायाम, हेल्दी डाएटचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. फळं, भाज्या, ड्रायफ्रूट्स यांचा समावेश आहारात करावा.

संबंधित बातम्या

Casual sex म्हणजे काय आणि त्याचे फायदे जाणून घ्या…

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ,  दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

ज्या सेक्स प्रकारामुळे नागपुरात अवघ्या काही महिन्यात दोघांचा जीव गेला तो किंकी सेक्स , BDSM सेक्स काय आहे? वाचा सविस्तर

Sex Life on Google – Why are these 10 big questions being asked about sex?