सर्फ एक्सलच्या जाहिरातीवर आक्षेप का?

मुंबई: डिटर्जंट पावडर कंपनी सर्फ एक्सल आपल्या नव्या जाहिरातीमुळे वादात सापडली आहे. होळीनिमित्त सर्फ एक्सलने काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ जाहिरात प्रसिद्ध केली होती. बंधूभावा वाढीचा संदेश देण्याच्या हेतूने सर्फ एक्सलने जाहिरात केली. पण ती जाहिरात अंगलट आली आहे. या व्हिडीओला लोक लव्ह-जिहादशी जोडत आहेत. इतकंच नाही तर सोशल मीडियावर सर्फवर बहिष्कार घालण्याबाबत #BoycottSurfExcel हा ट्विटर …

सर्फ एक्सलच्या जाहिरातीवर आक्षेप का?

मुंबई: डिटर्जंट पावडर कंपनी सर्फ एक्सल आपल्या नव्या जाहिरातीमुळे वादात सापडली आहे. होळीनिमित्त सर्फ एक्सलने काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ जाहिरात प्रसिद्ध केली होती. बंधूभावा वाढीचा संदेश देण्याच्या हेतूने सर्फ एक्सलने जाहिरात केली. पण ती जाहिरात अंगलट आली आहे. या व्हिडीओला लोक लव्ह-जिहादशी जोडत आहेत. इतकंच नाही तर सोशल मीडियावर सर्फवर बहिष्कार घालण्याबाबत #BoycottSurfExcel हा ट्विटर ट्रेण्ड सुरु आहे.

जाहिरातीत काय आहे?

सर्फ एक्सलने बंधूभावा वाढीचा संदेश देण्याच्या हेतूने जाहिरात बनवली. ‘रंग लाए संग’ या टॅगलाईनने सर्फने ही जाहिरात केली. हिंदू-मुस्लिम सद्भावनेला चालना मिळावी या हेतून ही जाहिरात बनवण्यात आली.

या जाहिरातीत हिंदू चिमुकली आणि मुस्लिम चिमुकला दाखवण्यात आला आहे. मात्र काही नेटीझन्सनी आक्षेप घेतला आहे.  त्यामुळेच त्याविरोधात #BoycottSurfExcel हा ट्विटर ट्रेण्ड सुरु आहे.

‘रंग लाए संग’ या टॅगलाईनने सर्फने ही जाहिरात केली. हिंदू-मुस्लिम सद्भावनेला चालना मिळावी या हेतून हा जाहिरात बनवण्यात आली.

पांढरा शर्ट परिधान केलेली हिंदू मुलगी सायकलवरुन गल्लीत फिरत असते. त्यावेळी बाल्कनीतून सर्वजण तिला रंग मारतात. ती सर्वांना आणखी रंग मारा असं सांगत असते. बाल्कनीतील मुलांचा रंग संपल्यानंतर, ती मुस्लिम चिमुकल्याला घरातून बोलवते. तो पांढरे शुभ्र कपडे घालून बाहेर येतो आणि ही चिमुकली त्याला मशिदीती नमाजासाठी सहीसलामत पाठवते. त्यावेळी तो चिमुकला नमाज पढकर आता हूँ असं तिला सांगतो, त्यावर चिमुकली म्हणते बाद में रंग पडेगा.

रामदेव बाबांचं ट्विट

दरम्यान, योगगुरु बाबा रामदेव यांनीही याबाबत ट्विट केलं. “आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. मात्र सध्या जे सुरु आहे, त्याबाबत विचार करणं आवश्यक आहे. परदेशी सर्फ एक्सेलने आम्ही कपडे धुतो, पण आता त्यांचीच धुलाई करण्याची गरज आहे”, असं रामदेव बाबांनी म्हटलं.

समर्थकही मैदानात

दरम्यान, या जाहिरातीच्या बाजूनेही अनेकजण उतरले आहेत. या जाहिरातीमध्ये आक्षेप घेण्यात काहीही तथ्य नाही. या जाहिरातीकडे लोक ज्या भावनेने बघतील त्यांना ती तशी दिसेल, असं सर्थकांचं म्हणणं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *