हेलिकॉप्टरमधून सायकलसह उडी, सायकलिंग स्टंटचा थरारक व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर रोज नवीन आणि विचित्र व्हिडीओ शेअर होत असतात. असाच एक विचित्र आणि धाडसी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे. हा व्हिडीओ एका स्कॉटीश बीएमएस्क (स्टंट करण्यासाठी वापरण्यात येणारी सायकल) रायडर क्रिस कायलीचा आहे. क्रिस या व्हिडीओमध्ये अत्यंत धाडसी स्टंट करताना दिसतो आहे, त्याचे हे स्टंट बघणाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारे आहेत. …

हेलिकॉप्टरमधून सायकलसह उडी, सायकलिंग स्टंटचा थरारक व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर रोज नवीन आणि विचित्र व्हिडीओ शेअर होत असतात. असाच एक विचित्र आणि धाडसी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे. हा व्हिडीओ एका स्कॉटीश बीएमएस्क (स्टंट करण्यासाठी वापरण्यात येणारी सायकल) रायडर क्रिस कायलीचा आहे. क्रिस या व्हिडीओमध्ये अत्यंत धाडसी स्टंट करताना दिसतो आहे, त्याचे हे स्टंट बघणाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारे आहेत.

या व्हिडीओमध्ये पहिल्या काही क्षणांत क्रिस उडणाऱ्या चॉपरमधून विना हार्नेसने 16 फुटावरुन सायकलसह उडी घेतो. त्यानंतर सुरुवात होते ती त्यांच्या धाडसी स्टंट्सची. तो संपूर्ण दुबईत आपल्या सायकलवर स्टंट करत फिरतो. या व्हिडीओमध्ये तो जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या गच्चीवरही स्टंट करताना दिसतो आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ‘रेड बुल’ या युट्यूब चॅनेलने शेअर केला आहे. यामध्य़े क्रिस हेल्मेट घालून 16 फुटांच्या उंचीवरुन उडी घेतो. त्यानंतर तो दुबईच्या रत्यांवर, वॉटर पार्कमधील स्लाईड्समध्ये, गर्दीच्या ठिकाणी, इमारतींच्या गच्चीवर खतरनाक असे स्टंट करतो. हा व्हिडीओ बघताना अनेकदा मनात धडकी भरते, तर पुढे त्याचा अपघात वगैरे तर होणार नाही ना अशी भीतीही वाटते. पण क्रिस त्याचे सायकलिंगमधील कौशल्य दाखवत हा स्टंट पूर्ण करतो. या व्हिडीओला आतापर्यंत 10 लाखाहून अधिक लोकांनी बघितलं आहे.

क्रिस कायली हा 26 वर्षीय स्कॉटीश बीएमएस्क रायडर आहे. पण हा क्रिसचा सर्वात आश्चर्यकारक आणि खतरनाक स्टंट नाही तर याआधीही त्याने अशाप्रकारचे अनेक धाडसी स्टंट केले आहेत. आपल्या या धाडसी सायकलिंग स्टंट बाबत बोलताना क्रिस म्हणतो की, “यासाठी मला माझ्या पूर्ण शरीराला तयार करावे लागले. कारण मला उंचीची भीती वाटते. जेव्हा मी चॉपरमध्ये बसलेलो होतो तेव्हा मी खूप घाबरलेलो होतो. पण मी मनाची तयारी केली आणि स्वत:ला समजावले की मी हे करु शकतो आणि मी ते करुन दाखवले.”

VIDEO :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *