लग्नानंतर सासू प्रेमाने वागावी असं वाटतं? मग 'या' वाक्यांचा वापर टाळाच

मुंबई : ‘सासू’ हा शब्द उच्चारला तरी प्रत्येक मुलीच्या डोळ्यासमोर रागट, खाष्ट, सतत चिडणारी, भांडण करणारी अशी व्यक्ती उभी राहते. लग्नाआधी मुलींची रिअलिटी शो प्रमाणे आपली सासू असावी अशी अपेक्षा असते. पण लग्नानंतर अनेक मुलींचा अपेक्षाभंग होतो. प्रत्येक मुलीला लग्नानंतर नवऱ्याबरोबरच सासूचंही मन जपावं लागतं. सासूच्या हव्या नको त्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. या गोष्टी करुनही …

लग्नानंतर सासू प्रेमाने वागावी असं वाटतं? मग 'या' वाक्यांचा वापर टाळाच

मुंबई : ‘सासू’ हा शब्द उच्चारला तरी प्रत्येक मुलीच्या डोळ्यासमोर रागट, खाष्ट, सतत चिडणारी, भांडण करणारी अशी व्यक्ती उभी राहते. लग्नाआधी मुलींची रिअलिटी शो प्रमाणे आपली सासू असावी अशी अपेक्षा असते. पण लग्नानंतर अनेक मुलींचा अपेक्षाभंग होतो. प्रत्येक मुलीला लग्नानंतर नवऱ्याबरोबरच सासूचंही मन जपावं लागतं. सासूच्या हव्या नको त्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. या गोष्टी करुनही कित्येकदा सासू सूनेची भांडण होतात. यावेळी भांडणात नकळत तुमच्याकडून काही वाक्यांचा वापर केला जातो. मात्र तुम्ही या वाक्यांचा वापर टाळलात, तर मात्र तुमची सासू तुमच्याशी अगदी प्रेमाने वागू शकते.

सुनांनी ‘या’ वाक्यांचा वापर टाळावा

1. मी तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा चांगले ओळखते

कधी कधी सहजच किंवा भांडण झाल्यानंतर मुलीशी सासूशी उद्धटपणे बोलतात. त्यावेळी ‘मी तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा चांगलंच ओळखते’ हे वाक्य सर्रास म्हटलं जातं. पण प्रत्येक मुलीने सासरी गेल्यानंतर या वाक्याचा वापर सहसा टाळावा. कारण कोणत्याही आईला तिच्या मुलाच्या सर्व सवयी माहिती असतात. तसंच हे वाक्य बोलल्यामुळे तुम्ही त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करताय असा गैरसमजंही तुमच्या सासूच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे सासू-सूनेच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.

2. आमच्या नात्यात तुम्ही ढवळाढवळ करु नका

लग्नानंतर नवरा-बायकोची शुल्लक कारणावरुन वाद होतात. हे वाद मिटावे यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून सासू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी कित्येकजणी तिचे काहीही न ऐकता, ‘हे आमच्या नवरा-बायकोचे भांडण आहे, त्यात तुम्ही ढवळाढवळ करु नका’ असे सांगतात. मात्र असे बोलल्याने तुमच्या सासूला राग येऊ शकतो. त्यामुळे सासू सल्ला द्यायला आल्यानंतर तिचा सल्ला ऐकून घ्या, त्याचा स्वीकार करायचा की नाही हे तुमच्यावर आहे.

3. मी माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळू शकते

लग्न झाल्यावर अनेक महिला नोकरी करतात. नोकरीमुळे त्यांना मुलांकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. अशावेळी नातवंडांना (तुमची मुलं) संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी सासू किंवा सासऱ्यांकडे दिली जाते. मात्र लहान मुले कित्येकदा खूप मस्ती करतात. यामुळे तुम्ही घरी गेल्यानंतर तुमची सासू तुम्हाला मुलाने केलेले पराक्रम सांगू लागते. अशावेळी काही मुली फटकळपणे ‘मी माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळू शकते’ असे सांगतात. यामुळे तुमची सासू तुमच्यावर नक्कीच रागवू शकते.

4. माझी आई तुमच्यापेक्षा स्वादिष्ट जेवण बनवते

लग्नापूर्वी मुलींना आपल्याला आईने केलेल्या जेवणाची चव आवडते. मात्र लग्नानंतर तोच पदार्थ सासू तयार केला, तर मात्र मुली नाक मुरडतात. सासू केलेला पदार्थ न खाताच तुम्हाला जेवण बनवता येत नाही, तुमच्यापेक्षा माझी आई फार उत्तम जेवण बनवते असे टोमणे मारण्यास सुरुवात करतात. मात्र यामुळे सासू-सूनच्या नात्यात मतभेद निर्माण होतात. सासूने केलेला एखादा पदार्थ तुम्हाला आवडला नाही, तर तिला पोट दुखतयं किंवा डायटिंगवर आहे हे कारण देऊन तुम्हाला टाळता येऊ शकते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *