शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी टोमॅटो अत्यंत फायदेशीर, वाचा !

प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. जवळपास सर्वच भाज्यांमध्ये टोमॅटो असते.

शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी टोमॅटो अत्यंत फायदेशीर, वाचा !
टोमॅटो

मुंबई : प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. जवळपास सर्वच भाज्यांमध्ये टोमॅटो असतात. हे टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. (Tomatoes are beneficial for increasing body water levels)

ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, टोमॅटो खाण्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. कारण टोमॅटोमध्ये जवळापास 94 टक्के पाणी असते. यामुळे विशेष: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टोमॅटो जास्तीत-जास्त खाल्ले पाहिजे. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशा व्यक्तींनी तर दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी एक टोमॅटो तरी खाल्ले पाहिजे. यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, मॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो. मॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते.

हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे. आपण एक टोमॅटो खाल्ले तर बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. ना वजन कमी करायचे आहे अशांनी दररोज सकाळी टोमॅटो खाल्ले पाहिजे.व्हिटामिन एची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही प्रकारच्या सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Tomatoes are beneficial for increasing body water levels)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI