Best Shopping Places: शॉपिंग करताय?, मुंबईतील स्ट्रीट शॉपिंगसाठी ही 5 खास ठिकाणे, जाणून घ्या!

भारतात अशी अनेक राज्ये आहेत जिथे भेट देण्यासाठी सुंदर पर्यटन स्थळेच नाहीत तर अतिशय प्रसिद्ध बाजारपेठा देखील आहेत. जर तुम्ही मुंबई फिरण्यासाठी येण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबईतील काही खास बाजारपेठेत खरेदी केल्याशिवाय तुमचा मुंबई फिरण्याचा प्लॅनच पूर्ण होऊ शकत नाही.

Best Shopping Places: शॉपिंग करताय?, मुंबईतील स्ट्रीट शॉपिंगसाठी ही 5 खास ठिकाणे, जाणून घ्या!
शाॅपिंग

मुंबई : भारतात अशी अनेक राज्ये आहेत जिथे भेट देण्यासाठी सुंदर पर्यटन स्थळेच नाहीत तर अतिशय प्रसिद्ध बाजारपेठा देखील आहेत. जर तुम्ही मुंबई फिरण्यासाठी येण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबईतील काही खास बाजारपेठेत खरेदी केल्याशिवाय तुमचा मुंबई फिरण्याचा प्लॅनच पूर्ण होऊ शकत नाही. या बाजारांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे मिळणाऱ्या वस्तू. यासह, या बाजारपेठा राज्याच्या संस्कृतीचे आणि पोशाखाचेही उत्तम वर्णन करतात. मुंबईच्या कोणत्या बाजारपेठांमध्ये तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता ते जाणून घेऊया. (Best 5 Shopping Places in Mumbai)

कुलाबा 

कुलाबा कॉजवे मुंबईच्या सर्वात लोकप्रिय बाजारपेठांपैकी एक आहे. या बाजारपेठेत बरीच गर्दी आपल्याला बघायला मिळेल. दागिने, विविध पोशाख, चप्पल, पिशव्या ते प्राचीन वस्तूंपर्यंत, या ठिकाणी मिळते. विशेष म्हणजे या सर्व वस्तूंवर भरपूर ऑफर देखील असतात.

क्रॉफर्ड मार्केट

जर तुम्हाला मुंबईत खरेदी करायची असेल तर क्रॉफर्ड मार्केट तुमच्या यादीत असणे आवश्यक आहे. हे शहरातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. फळे, भाज्या, पिशव्या, मेकअप, घरातील सजावटीच्या वस्तूंपासून ते खेळण्यांपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील.

लिंकिंग रोड

येथे तुम्हाला विविध प्रकारचे परवडणारे आणि ट्रेंडी कपडे, दागिने, शूज मिळतील. मुंबईत रस्त्यावरील खरेदीच्या अनुभवासाठी लिंकिंग रोड सर्वात महत्वाचा आहे. हे वांद्रे येथे आहे जे शहराच्या सर्वात भव्य परिसरापैकी एक आहे. या बाजारात काही ब्रँडेड शोरूम आणि बुटीक देखील आहेत.

हिल रोड

खरेदीसाठी मुंबईतील आणखी एक ठिकाण म्हणजे हिल रोड. हिल रोड बाजारामध्ये नेहमीच वर्दळ बघायला मिळते. या बाजारामध्ये तुम्ही खूप कमी किंमतीत कपडे खरेदी करू शकाल.

हिंदमाता मार्केट

जर तुम्ही विविध प्रकारचे कापडे, साड्या, ड्रेस मटेरियल आणि भारतीय पोशाख शोधत असाल तर थेट या बाजारात जा. ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी बाजारपेठ आहे. लग्नाच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार येथे खरेदी करू शकता.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Best 5 Shopping Places in Mumbai)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI