Skin Care : ऑईली स्कीन असणाऱ्यांना हिवाळा त्रासदायक; करा हे उपाय

लवकरच थंडीचे दिवस सुरू होतील. मात्र हा ऋतू आपले आरोग्य आणि त्वचा या दोन्हींसाठी फारसा चांगला नसतो.

Skin Care : ऑईली स्कीन असणाऱ्यांना हिवाळा त्रासदायक; करा हे उपाय
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 9:25 PM

हवामानात जरासाही बदल झाल्यास त्याचा सर्वात पहिला परिणाम हा आपल्या त्वचेवर (skin) झालेला दिसून येतो. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आणि हवेत थोडाफार थंडावाही जाणवायला लागला आहे. अशा हवामानात तेलकट त्वचा (oily skin) असलेल्या लोकांनी जास्त सतर्क होण्याची गरज आहे. तुमची त्वचाही तेलकट असेल तर काही टिप्स जरूर (home remedies) फॉलो करा.

लवकरच थंडीचे दिवस सुरू होतील. मात्र हा ऋतू आपले आरोग्य आणि त्वचा या दोन्हींसाठी फारसा चांगला नसतो. ज्या लोकांची त्वचा तेलकट असते, त्यांना या हवामानात जास्त त्रास होतो.

क्लीन्जिंग

आपल्या त्वचेमध्ये सेबमचे उत्पादन वाढले तर अतिरिक्त तेल दिसू लागते. हे अतिरिक्त तेल काढण्यासाठी दिवसातून तीन वेळा चेहरा स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेच्या अनके प्रकारानुसार बाजारात अनेक फेस वॉश किंवा क्लिन्जर्स उपलब्ध आहेत. आपली त्वचा कशी आहे हे आहे लक्षात घेऊन त्याप्रमाणे क्लीन्जरचा वापर करावा.

स्क्रबिंग

त्वचेवरील तेल आणि धूळ, घाण यामुळे पिंपल्स किंवा मुरूमे येतात आणि तिथे डार्क स्पॉट्सही येतात. सणासुदीच्या दिवसात त्वचेवर पिंपल्स नको असतील तर आठवड्यातून किमान 2 वेळा तरी स्क्रबिंग जरूर करावे. त्याने त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होईल.

फेस मास्क

फेस क्लीन्जिंग शिवाय स्किन मास्क च्या माध्यमातून अतिरिक्त काळजीही घेतली पाहिजे. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी फेस मास्कचा वापर केला पाहिजे. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही कॉफी आणि मधाचा मास्क वापरू शकता.

अल्कोहोल फ्री टोनर

त्वचेसाठी टोनरचा वापर केल्यास त्वचा दुरूस्त होते. टोनरद्वारे, त्वचेच्या छिद्रांमधील घाण दूर होते आणि उजळपणाही येतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी टोनरचा वापर करू शकता. तसेच कोरफडीचा रस किंवा जेल यांचा टोनरही सर्व प्रकारच्या त्वचेसाठी अनुरूप ठरू शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.