तुम्हालाही वायरल फिवरचा त्रास होतोय?

वातावरणात जरासही बदल झाला तरी अनेकदा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे यासारखे आजार होतात. वातावरण बदलातील आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होती.

तुम्हालाही वायरल फिवरचा त्रास होतोय?

मुंबई : वातावरणात जरासही बदल झाला तरी अनेकदा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे यासारखे आजार (Viral Fever) होतात. वातावरण बदलातील आजारामुळे (Viral Fever) शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. त्यामुळे एका व्यक्तीला सर्दी, खोकला झाल्यानंतर त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होतो. अनेकदा डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतरही आपल्याला आराम मिळत नाही. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही यावर उपचार करु शकता.

वातावरणात बदल झाला की आपल्या शरीरात थोड्या फार प्रमाणात बदल होता. वातावरण बदलातील आजार होण्यापूर्वी घसा दुखणे, खोकला, डोकेदुखी, निरउत्साही वाटणे, गुडघे दुखी यासारखी लक्षण दिसतात. त्याशिवाय डोळे लाल होणे, अंग अचानक गरम होणे ही सुद्धा वातावरण बदलातील प्रमुख लक्षण आहेत.

घरगुती औषधोपचार

1. हळद आणि सुंठ पावडर
आले हे औषधी आहे. आल्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याला अँटी आक्सिडेंट म्हणून ओळखले जात. एका कपात पाणी घेऊन त्यात एक चमचा काळीमिरी चुर्ण, लहान चमचा हळदीचे चुर्ण आमि एक चमचा सुंठ टाका. त्यासोबतच थोडी साखर घाला. यानंतर हे पाणी चांगले उकळून थंड करुन प्या. हा औषधी काढा प्यायल्याने वायरल आजारांपासून तात्काळ आराम मिळतो.

2. तुळशीचा वापर
तुळसी ही औषधी वनस्पती आहे. यात अँटीबायोटिक गुणधर्म असल्याने ते शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एका भांड्यात एक लीटर पाण्यात लंवगचे चुर्ण आणि दहा-बारा तुळशीची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून थंड करुन तासाभराने प्या. यामुळे वायरल आजारांपासून शरीराला आराम मिळतो.

3. कोथिंबीरीचा चहा
कोथिंबीरमुळे अनेक आजारांमुळे आपली सुटका होऊ शकते. कोथिंबिरीचा चहा प्यायलयाने आजारपणापासून सुटका मिळते.

4. मेथीचे दाणे
आपल्या स्वयंपाकघरात मेथीचे दाणे नियमित आढळतात. रात्रभर एका कपात मेथीचे दाणे भिजवा. सकाळी उठल्यानंतर गाळून हे पाणी प्या. तुम्हाला वायरल आजारांपासून लगेच आराम मिळेल

5. लिंबू आणि मध
लिंबाचा रस आणि मधही हे ही वायरल आजारांसाठी गुणकारी आहे. तुम्ही मध आणि रसही प्यायल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *