AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा किडनी होऊ शकते निकामी 

सध्या कफ सिरपमुळे अनेक लहानग्यांचे जीव गेले आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. तसेच कफ सिरप द्यावे की नाही असाही प्रश्न पालकांना सतावत आहे. त्यामुळे लहान मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचं असतं अन्यथा त्याचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो. चला जाणून घेऊयात मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे. 

मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा किडनी होऊ शकते निकामी 
What precautions should be taken while giving cough syrup to children? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2025 | 7:48 PM
Share
बदलत्या हवामानात मुलांना फ्लू आणि खोकल्यासारखे आजार होतात. लहान मुलांवर तर बदलत्या हवामानाच लगेच परणाम होतो. अशा वेळी खोकल्यासाठी लहान मुलांना शक्यतो कफ सिरप दिले जाते. पण सध्या यामुळे सर्व पालकांच्या मनात भीती बसली आहे. तथापि, राजस्थान आणि मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंमुळे सगळ्याच पालकांमध्ये चिंता वाढली आहे.त्यामुळे आता केंद्र सरकारने काही कफ सिरपवर बंदी घालण्यास सांगितली आहे.
उत्तराखंडचे औषध नियंत्रक यांनी सांगितले की, केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मुलांच्या कफ सिरपमध्ये डेक्स्ट्रोमेथोर्फन, फेनिलेफ्रिन, हायड्रोक्लोराइड आणि यापासून बनवलेले मिश्रण समाविष्ट आहे.
वयाच्या या वर्षा खालील मुलांना  कफ सिरप देऊ नये 
दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नये आणि चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देताना काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत. इतर राज्यांमध्ये कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूंमुळे जनतेत संताप निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाचे पथक राज्यभरातील मेडिकल स्टोअर्स, औषध घाऊक विक्रेते आणि रुग्णालयातील फार्मसी स्टोअर्सची तपासणी करत आहेत.
चूक कुठे होते?
पण कफ सिरप देताना नेमकी चूक कुठे होते देखील समजणे गरजेचे आहे. कारण एवढ्या वर्षांपासून कफ सिरप लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच पित आलेत मग चूक कुठे झाली ज्यामुले अनेक लहानग्यांना आपला जीव गमवावा लागला. चला जाणून घेऊयात. मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे.
 कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. 
तज्ज्ञांच्या मते कफ सिरपमध्ये डेक्सट्रोमेथोर्फनसारखे हानिकारक पदार्थ असतात, जे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नयेत. कफ सिरप बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांचा मुलांच्या हृदयावर आणि मूत्रपिंडांवर परिणाम होतो. म्हणून, असे सिरप 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नयेत. तथापि, असे दिसून येते की एकतर योग्य डॉक्टर न मिळाल्यास असे परिणाम दिसून येतात किंवा मुलांनी लवकर बरे होण्यासाठी केमिस्टकडून स्वतः विकत घेतात, जे मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.
अन्यथा  या अवयवांचे  होऊ शकते नुकसान?
त्यामुळे योग्य डॉक्टरांच्या किंवा बालरोगतज्ञांचा सल्ल्यानेच  लहान मुलांना औषध द्या. तेसच मनाने जास्त केमिकलवालं सिरप जर एखाद्या खूपच लहान मुलालाल दिलं तर ते घेतल्यानंतर उलट्या, पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवतात. मूत्रपिंडात क्रिस्टल्स तयार होतात, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो.
तसेच चुकीचे सिरप दिल्याने मेंदूलाही नुकसान होऊ शकते, जे प्राणघातक ठरू शकते. खोकल्याचे दोन प्रकार असतात कोरडा खोकला आणि ओला खोकला. दोन्हीसाठी वेगवेगळी औषधे आणि उपचार आहेत. त्यामुळे मनाने सिरप आणण्यापेक्षा सर्वात आधी योग्य डॉक्टरांची निवड करून त्यांच्याकडून मुलांची तपासणी करून घ्या आणि मगच औषध किंवा सिरप वैगरे घ्या. म्हणजे धोका होणार नाही.
असा पुरूष सिंह होणे नाही... संजय राऊतांकडून बाळासाहेबांना मानवंदना
असा पुरूष सिंह होणे नाही... संजय राऊतांकडून बाळासाहेबांना मानवंदना.
अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?.
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट.
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी.
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर.
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.