हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅक येण्याचा धोका? जाणून घ्या काय घ्यावी काळजी

थंडी सुरु झाली आहे. रात्री थंडीचं प्रमाण हळूहळू वाढत चाललं आहे. गेल्या ४ वर्षातील अधिक थंडी या वर्षी नोंदवली गेली आहे. येत्या महिन्यात आणखी थंडी वाढू शकते. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामागचं कारण काय आणि काळजी कशी द्यावी ते पण जाणून घ्या.

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅक येण्याचा धोका? जाणून घ्या काय घ्यावी काळजी
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 5:56 PM

भारतात थंडीचे आगमन झाले असून यंदा डिसेंबरच्या आधीच थंडी जाणवू लागली आहे. थंडीचा जोर हळूहळू वाढत चालला आहे. महाराष्ट्रात थंडीने हळूहळू जोर पकडायला सुरुवात केलीये. थंडीत कोणी विशेष काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते. अनेकांना कदाचित ही गोष्ट माहित नसेल. या मोसमात हृदयविकाराच्या झटक्याने जास्त लोकांचा जीव जातो. त्यामुळे थंडीच्या या दिवसाीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून हृदयविकाराचा धोका टाळता येईल. हे जाणून घेऊयात.

थंडीत हृदयविकाराचा धोका का वाढतो?

थंडीत रक्तवाहिन्या आकसतात. यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो. हिवाळ्यात हवेचे प्रदूषण देखील जास्त असते. यामुळे प्रदूषणाचे कण श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जातात आणि ते रक्तात जमा होतात. यामुळे मग शिरांमध्ये अडथळे निर्माण होतात. आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात लोकांची शारीरिक हालचाली कमी असते. तसेच हिवाळ्यात लोकं तळलेले आणि जास्त कॅलरी असलेले अन्न जास्त खातात. सूर्यप्रकाश कमी असल्याने व्हिटॅमिन डीची समस्या देखील उद्भवते. फ्लू सारखे श्वसन संक्रमण हिवाळ्यात वाढते. रक्तवाहिन्यांना यामुळे सूज येऊ शकते. जर थायरॉईड सामान्यपणे कार्य करत नसेल तर हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

हिवाळ्यात कशी घ्याल काळजी?

हिवाळ्यात तुम्ही हृदयाची योग्य काळजी घेतली पाहिजे. जास्त कोलेस्ट्रॉल असलेले बाहेरचे अन्न खाणे टाळले पाहिजे. हृदयाला अनुकूल अशा गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. फ्लेक्ससीड, लसूण, दालचिनी आणि हळद यांचा जेवणात समावेश करावा. धूम्रपान आणि मद्यपान टाळले पाहिजे. रोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. रक्तदाब नियंत्रणात राहिली याची काळजी घ्या.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.