तुमच्या सेक्स लाईफमध्ये रोमान्स का नाही? अशा चुका तर तुम्ही करत नाहीत ना?

पुष्कळ पुरुष फेमिनिज्मच्या मूल्यांना खुलेपणाने पाठिंबा देत असल्याचंही समोर आलंय. आता अशा अभ्यासानुसार फेमिनिज्मला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांच्या बेडरूमच्या जीवनाबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्यात. Why no romance in your sex life

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:46 PM, 6 Apr 2021
तुमच्या सेक्स लाईफमध्ये रोमान्स का नाही? अशा चुका तर तुम्ही करत नाहीत ना?
no romance in your sex life

नवी दिल्लीः स्त्रियांबद्दल असलेली आपली विचारसरणीसुद्धा आपले लैंगिक जीवन बर्‍याच प्रमाणात रोमांचक करत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. गेल्या काही वर्षांपासून फेमिनिज्म (स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत) वरील चर्चा होत आहे आणि पुष्कळ पुरुष फेमिनिज्मच्या मूल्यांना खुलेपणाने पाठिंबा देत असल्याचंही समोर आलंय. आता अशा अभ्यासानुसार फेमिनिज्मला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांच्या बेडरूमच्या जीवनाबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्यात. (Why is there no romance in your sex life? You don’t make such mistakes, do you?)

फेमिनिज्मचे समर्थन करणारे पुरुष बेडरूममध्येही समानतेची काळजी घेतात

सोशियोलॉजिस्ट टीना फॅटनर यांनी नुकत्याच दिलेल्या एका लेखात सांगितले आहे की, फेमिनिज्मचे समर्थन करणारे पुरुष बेडरूममध्येही समानतेची काळजी घेतात आणि म्हणूनच त्यांचे लैंगिक जीवन अधिक चांगले असते. त्या म्हणाल्या, फेमिनिज्म पुरुषांचे लैंगिक जीवन हे नॉन फेमिनिज्म पुरुषांच्या तुलनेत कसे असते, याबद्दल आम्हाला जाणून घेण्यात विशेष रस होता. म्हणजेच त्यांच्या पर्सनल पॉलिटिक्सनुसार कोणत्याही स्त्रीनं सेक्सदरम्यान भिन्न वागणूक दिली पाहिजे का हे याची माहिती घ्यायची होती.

एका मोठ्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या पुरुषांच्या अनुभवाचे विश्लेषण

या सर्व प्रश्नांच्या उत्तरात कॅनडामधील ‘सेक्स आणि लैंगिकता’ या विषयावरील एका मोठ्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या पुरुषांच्या अनुभवाचे विश्लेषण केले गेले. ‘द सेक्स इन कॅनडा सर्व्हे’ हे कॅनेडियन नागरिकांचे देशव्यापी सर्वेक्षण आहे, जे लैंगिकता तसेच वैयक्तिक लैंगिक वर्तन, लैंगिक इतिहास, राजकीय आणि सामाजिक मूल्य याबद्दल माहिती देते.

फेमिनिस्ट पुरुष नॉन फेमिनिस्ट पुरुषांपेक्षा जास्त कामुक

कॅनेडियन पुरुषांवर आधारित या सर्वेक्षणात केवळ 22 टक्के लोक खरोखरच फेमिनिस्ट असल्याचे आढळले. तर बहुतेक पुरुष (सुमारे 60 टक्के पुरुष) म्हणाले की, ते फेमिनिस्ट नाहीत. त्याच वेळी 18 टक्के असे लोक देखील आढळले, ज्यांनी याला ‘नॉट श्योर’ सांगून हात झटकले. आपण गेल्या काही दिवसांपूर्वींच्या अभ्यासांकडे पाहिल्यास जसे फेमिनिस्ट स्त्रियांप्रमाणे, फेमिनिस्ट पुरुष असण्याची शक्यता जास्त होती.
पुरुषांच्या लैंगिक आयुष्याच्या पाहणीवर सर्वेक्षणात असे आढळले आहे की, फेमिनिस्ट पुरुष नॉन फेमिनिस्ट पुरुषांपेक्षा जास्त कामुक असतात.

फेमिनिस्ट पुरुषांचा नॉन-फेमिनिस्ट पुरुषांच्या तुलनेत महिला जोडीदारांसोबत जास्त ओरल सेक्स

इतकेच नाही तर फेमिनिस्ट पुरुषांनी नॉन-फेमिनिस्ट पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या महिला जोडीदारांसोबत जास्त ओरल सेक्स केलाय. अभ्यासानुसार फेमिनिज्मवर विश्वास ठेवणार्‍या पुरुषांचे लैंगिक जीवन अधिक रोमांचक असते आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे सेक्सचे प्रकार करतात. पुरुषांच्या सर्वात अलिकडील लैंगिक हालचालींचा अभ्यास संशोधकांनीही केलाय. इथेही फेमिनिज्म पुरुष आणि ‘नॉट श्योर’ वाले पुरुष ग्रुप इंटरकोर्स आणि महिलांना उत्तेजित करण्याच्या प्रयत्नात नॉन फेमिनिस्ट पुरुषांच्या तुलनेत पुढे आहेत.

फेमिनिस्ट पुरुष जे काय म्हणतात, ते प्रत्यक्षात तसे करत नाहीत

फेमिनिज्म आणि ‘नॉट श्योर’ या दोन्ही प्रकारातील पार्टनरनं आपल्या महिला जोडीदाराबरोबर नॉन फेमिनिस्ट पुरुषांच्या तुलनेत जास्त ओरल सेक्स केल्याची माहिती दिलीय. कारण बर्‍याच अभ्यासाने हे सातत्याने उघड केले आहे की, ओरल सेक्स क्लिटोरल स्टिम्युलेशनमुळे (उत्तेजना) स्त्रियांमध्ये कामोत्तेजना वाढत असल्याचंही समोर आलंय. फेमिनिस्ट पुरुषांच्या वागण्याबाबत, तज्ज्ञ म्हणाले, ‘फेमिनिस्ट पुरुष जे काय म्हणतात, ते प्रत्यक्षात तसे करत नाहीत. प्रामुख्याने त्यांच्या सार्वजनिक वृत्ती आणि वागण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. परंतु बंद दारामागील त्यांचे वास्तव काय आहे, याचीही माहिती आता मिळालीय. एका तज्ज्ञाने असेही म्हटले आहे की, खासगी लैंगिक हालचालीत फेमिनिस्ट पुरुष नॉन फेमिनिस्ट पुरुषांच्या तुलनेत आपल्या महिला जोडीदाराची जास्त काळजी घेतात. यामुळेच त्याचे लैंगिक जीवन इतरांपेक्षा अधिक रोमांचक बनते.

संबंधित बातम्या

Casual sex म्हणजे काय आणि त्याचे फायदे जाणून घ्या…

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ,  दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

ज्या सेक्स प्रकारामुळे नागपुरात अवघ्या काही महिन्यात दोघांचा जीव गेला तो किंकी सेक्स , BDSM सेक्स काय आहे? वाचा सविस्तर

Why is there no romance in your sex life? You don’t make such mistakes, do you?