Yoga Tips | शरीर लवचिक आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेकारक!

सध्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आपण दिवसभर एकाच स्थितीत बसून असतो. त्यामुळे सध्या पाठदुखीच्या समस्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते.

Yoga Tips | शरीर लवचिक आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेकारक!
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 6:23 PM

मुंबई : आज देशात योगाचे (Yoga Tips) महत्त्व वाढले आहे. बरेच लोक स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगसने करत आहेत. योगामुळे आपल्या मणक्याची हाडे मजबूत होतात. तसेच, शरीरही लवचिक राहण्यास मदत होते. आपल्यापैकी बहुतेक लोक वारंवार पाठदुखी, मणक्यासंबंधित समस्यांचा (Spinal strength) सामना करत असतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे बसण्या-उठण्याची अयोग्य पद्धत. सध्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आपण दिवसभर एकाच स्थितीत बसून असतो. त्यामुळे सध्या पाठदुखीच्या समस्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते. या शिवाय मानेच्या स्नायूंमध्येदेखील वेदना होतात. जर आपण देखील या सर्व समस्यांमुळे त्रस्त असाल तर, या सोप्या योगासनांनी समस्यांचे निराकरण करू शकता. (Yoga Tips For flexible body and spinal strength)

शलभासन

हे आसन केल्याने तुमचे स्नायू बळकट होतात. हे आसन खूप सोपे असल्याने कोणीही ते सहज करू शकतात. यासाठी उपडी झोपून, आपली हनुवटी चटईवर खाली ठेवा आणि हात मांड्यांपर्यंत सरळ ठेवा. श्वास घेताना हाताचे तळवे आणि पाय हळूहळू वर घ्या. आपल्या पाठीवर दबाव जाणवत नाही तोपर्यंत शरीराला ताणले पाहिजे. या आसनादरम्यान 10 वेळा श्वास घ्या. हर्निया, अल्सर आणि हृदयरोग यासारखे आजार असल्यास हे आसन करू नका. (Yoga Tips For flexible body and spinal strength)

ऊर्ध्व मुख श्वानासन

ऊर्ध्व मुख श्वानासनामुळे छाती, हातपाय आणि मणक्याचे स्नायू मजबूत होतात. या आसनात उपडी झोपून हाताचे तळवे जमिनीवर दाब देऊन ठेवा. पायाच्या बळावर शरीरावर ताणून घ्या आणि सरळ दिशेत समोर पहा. आपल्या शरीरास शक्य तितके ताणून धरा. दहा वेळा श्वास घेईपर्यंत या आसन मुद्रेमध्ये राहा. (Yoga Tips For flexible body and spinal strength)

धनुरासन

पाठदुखीच्या समस्येवर धनुरसान अतिशय फायदेकारक ठरते. या आसनामुळे पाठदुखीची समस्या कमी होते. धनुरासन करण्यासाठी आधी उपडी होऊन ताठ झोपावे. दोन्ही हात आणि पाय सरळ रेषेत ताणावे. मग दोन्ही पाय उलट्या दिशेने वर उचलून दोन्ही हातांनी ताणून धरा. यादरम्यान शरीरावर थोडा ताण देऊन, शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे करा. धनुष्याप्रमाणे शरीर ताणले जात असल्यानेच या आसनाला धनुरासन म्हणतात. 10 मिनिटे या आसनमुद्रेत राहण्याचा प्रयत्न करा. हर्निया, अल्सर आणि हृदयरोग असलेल्या लोकांना हे आसन करु नये.

(Yoga Tips For flexible body and spinal strength)

हेही वाचा : 

मेंदूतल्या नसांपर्यंत पोहोचला जीवघेणा Coronavirus, AIIMS मध्ये समोर आलं धक्कादायक प्रकरण

Protein Food | प्रोटीनसाठी ‘आर्टिफिशियल सप्लीमेंट्स’ऐवजी, आहारात करा ‘या’ नैसर्गिक घटकांचा समावेश!

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.