तटकरेंविरोधात रायगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार तयार?

रायगड : लोकसभा निवडणुका काही दिवासांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उमेदावर ठरण्याआधीच सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मतदारसंघांमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे. अशातच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली असतानाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडधून आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे पंकज तांबे सज्ज झाले आहेत. पंकज तांबे हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते …

तटकरेंविरोधात रायगडमध्ये काँग्रेसचा उमेदवार तयार?

रायगड : लोकसभा निवडणुका काही दिवासांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उमेदावर ठरण्याआधीच सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मतदारसंघांमध्ये प्रचाराला सुरुवातही केली आहे. अशातच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली असतानाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगडधून आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे पंकज तांबे सज्ज झाले आहेत.

पंकज तांबे हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. याच पंकज तांबे यांनी थेट सुनील तटकरे यांच्याच विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार पंकज तांबे

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तर सेना-भाजपा युती हे समीकरण जुळलेलच असते. ग्रामपंचायतींसह पचांयत समिती, जिल्हा परिषद ते नगरपचांयत, नगरपालिका स्थानिक स्वराज्य सस्थेंसाठी राष्ट्रवादी आणि शेकापने आघाडी केली आहे. यात सुनील तटकरे यांनी काँग्रेसला सोबत घेतल्याचे केवळ चित्र निर्माण केले. मात्र, कुठलेही पद किंवा महत्त्वाचा विभाग त्यांनी दिला नाही, असा आरोप काँग्रेसकडून कायम केला जातो.

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

तसेच, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. त्यामुळे काँग्रेसला उमेदवारासाठी अचानक धावाधाव करावी लागली होती. त्यामुळे पुढे अशावेळी काँग्रेस कमी पडू नये म्हणून रायगड जिल्ह्याती माणगावमधील काँग्रेसचे स्थानिक नेते पंकज ताबे यांनी वरिष्ठांना कळवून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटाघाटीमध्ये रायगडची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, रायगड हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. बॅ. अतुंले यांनी या जिल्ह्यासह कोकणात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी आपण उमेदवारी मागितली असून, पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लढण्यास तयार आहोत, असे काँग्रेसचे स्थानिक नेते पंकज तांबे यांच्या माणगाव येथी निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनतंरच्या पत्रकार परिषदेमध्ये पंकज तांबे यांनी माहीती दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *