लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते...

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते...

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांची आघाडी निश्चित झाली आहे. फक्त चार जागांवर घोडं अडल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारीच सांगितलंय. पण अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केली असल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचंही नाव आहे.

पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. या व्हायरल यादीत मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पार्थ पवारांचं नाव देण्यात आलंय. शिवाय अहमदनगरची जागा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंसाठी सोडावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. पण या व्हायरल यादीत अहमदनगरसाठीही राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याचं म्हटलंय.

काय आहे व्हायरल यादी?

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात इतर पक्ष नसल्यास दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 24-24 जागा येतील. पण या व्हायरल यादीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 21 जागा आल्याचं दाखवलंय, ज्यात हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीला दिल्याचा दावा करण्यात आलाय.

यादी खालीलप्रमाणे

1) बारामती – सुप्रिया सुळे

2) कोल्हापूर – धनंजय महाडिक

3) सातारा – उदयनराजे भोसले

4) माढा-विजयसिंह मोहिते-पाटील

5) रायगड – सुनील तटकरे

6) औरंगाबाद – सतीश चव्हाण

7) परभणी – राजेश विटेकर

8) बुलढाणा – राजेंद्र शिंगणे

9) भंडारा गोंदिया – वर्षा पटेल / मधुकर कुकडे

10) रावेर – संतोष चौधरी

11) शिरूर – विलास लांडे

12) जळगाव – अनिल भाईदास पाटील

13) नाशिक – समीर भुजबळ

14) ठाणे – संजीव नाईक

15) बीड – अमरसिंह पंडित

16) उस्मानाबाद – राणा पाटील /अर्चना पाटील

17) ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील

18) दिंडोरी – धनराज महाले

19) मावळ-पार्थ पवार

20) हातकणंगले – राजू शेट्टी

21) नगर दक्षिण – डॉ. सर्जेराव निमसे

व्हायरल यादीमागचं वास्तव काय आहे?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी कोणतीही यादी जाहीर करण्यात आली नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिलंय. सोशल मीडियावर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची एक यादी फिरत आहे. ती यादी खोटी असून पक्षाने अधिकृतरित्या कुठलीही उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या या यादीवर विश्वास ठेवू नये. राष्ट्रवादीची अधिकृत यादी पक्षाच्या पातळीवर कार्यालयीन माध्यमातून जाहीर केली जाईल, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेली यादी खोटी असल्याचं या पडताळणीतून समोर आलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *