VIDEO : भाजपने बाईक रॅलीसाठी पैसे वाटले, व्हिडीओ व्हायरल

लखनऊ : भारतीय जनता पार्टीच्या बाईक रॅली दरम्यान गर्दी दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन बोलवण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. पैसे वाटत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे भाजपावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील चंदोसी येथील आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण […]

VIDEO : भाजपने बाईक रॅलीसाठी पैसे वाटले, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

लखनऊ : भारतीय जनता पार्टीच्या बाईक रॅली दरम्यान गर्दी दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन बोलवण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. पैसे वाटत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे भाजपावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील चंदोसी येथील आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण देशात विजय संकल्प रॅलीचे आयोजन 2 मार्च (शनिवारी ) करण्यात आले होते. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. मात्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाज कल्याण मंत्री गुलाबो देवींच्या उपस्थितीत रॅलीमध्ये गर्दी वाढवण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते. 2000 ते 100 रुपयांच्या नोटा यावेळी वाटण्यात आल्या.

चंदोसी विधानसभा क्षेत्रातील बाईक रॅलीची जबाबदारी समाज कल्याण मंत्री गुलाबो देवी यांना देण्यात आली होती. रॅलीमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती. मात्र रॅली संपल्यानंतर भाजपच्या काही तथाकथित कार्यकर्त्यांकडून रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भाजपच्या भाड्याच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटत होते. ही घटना कॅमेरात कैद होताच सर्वत्र व्हायरल झाली आहे. 

बाईक रॅलीमध्ये जे लोक भाजपा कार्यकर्ता बनून फिरत होते. ते मात्र सर्व माथाडी कामगार असल्याचे बोललं जात आहे. या सर्वांना पैसे देतो असे सांगून या रॅलीमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. चंदोसीच्या शेजारील गावातील लोकांनाही यावेळी बोलवण्यात आले होते. पैसे देऊन आणलेल्या या कार्यकर्त्यांबद्दल गुलाबो देवी आणि भाजपचे स्थानिक नेते प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत.

व्हिडीओ : 

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.