चंद्रपुरात भीषण अपघात; १० मजूर ठार; चिमुकला बचावला

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व मजूर आहेत. विशेष म्हणजे या भीषण अपघातात एक वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा …

चंद्रपुरात भीषण अपघात; १० मजूर ठार; चिमुकला बचावला

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व मजूर आहेत. विशेष म्हणजे या भीषण अपघातात एक वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मजुरांच्या टाटा मॅजिक वाहनाला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडून आला.

हे सर्व मजूर कोरपना येथील विदर्भ जिनिंगमध्ये कामासाठी आले होते. मात्र काम न मिळाल्यामुळे ते शनिवारी रात्री गावी परत जाण्यासाठी निघाले. मात्र कोरपना-वणी मार्गावर हेटी या गावाजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रक ने त्यांच्या टाटा मॅजिक गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात टाटा मॅजिक गाडीचा चक्काचूर झाला. कोपरना-वणी मार्गावर हेटी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात मृत पावलेल्या लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *