शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही, अजून निधी जाहीर करा - पंकजा मुंडे

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटीच्या पॅकेजवर त्यांनी घणाघाती टीका केली.

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही, अजून निधी जाहीर करा - पंकजा मुंडे

बीडः 10 हजार कोटीचं पॅकेज सरकारनं घोषित केलं. हे पॅकेज पुरेसं नाही. या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली आहे. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल करतानाच सरकारला हे पॅकेज वाढवण्याची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटीच्या पॅकेजवर त्यांनी घणाघाती टीका केली. (pankaja munde on farmer help package)

लॉकडाऊनमध्ये ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, आम्हाला खायला काही नाही. व्हिडीओ कॉल करून ते दाखवत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच आहेत, त्यांनी प्रेमानं विचारलं किती आदळआपट करशील, तर मी म्हणाले ऊसतोड कामगारांसाठी आदळआपट करावीच लागेल. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या 10 हजार कोटींचं पंकजा मुंडेंनी टीका केली. शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

आजही माझ्याकडे कुठलंच पद नाही. संपत्ती कमी झाली तरी चालेल पण माझ्या दारातली गर्दी कधी कमी होता कामा नये, अशीच मी प्रार्थना करते, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. भगवान गडावर उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली, अशा जोरदार घोषणाबाजी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. ऊसतोड कामगारांसाठीच माझा कारखानाही मी उशिरा सुरू केला. कारण माझ्या कामगारांचा संप सुरू आहे. बोलणाऱ्याचं काय जातं, जा तुम्ही संप करा म्हणून सांगतात. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत.

आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसं घ्यायचं आणि काम कसं करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन. मुंडेंच्या विचारांची जबाबदारी माझ्यावर आहे. मला तुमच्या कर्जात राहायला आवडेल, असंही उपस्थितांना संबोधून त्या म्हणाल्या. लॉकडाऊनमध्ये ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, आम्हाला खायला काही नाही, व्हिडीओ कॉल करून ते दाखवत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच आहेत, त्यांनी प्रेमानं विचारलं किती आदळआपट करशील, तर मी म्हणाले ऊसतोड कामगारांसाठी आदळआपट करावीच लागेल. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजवरही पंकजा मुंडेंनी टीका केली. शेतकऱ्यांना भरघोस मदतीची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या दसऱ्या मेळाव्याला कोणीही येऊ नये, असं मी सांगितलं आहे. परंतु ऑनलाइन मेळावा असतानाही बरेच लोक आले आहेत. हेलिकॉप्टरनं येण्याची परंपरा होती, पण कोरोनामुळे ही हेलिकॉप्टरऐवजी गाडीनं आले. अतिवृष्टीनं शेतकरी बेजार झाला आहे. भगवान बाबांची मूर्ती माझ्या पाठीशी आहे. भगवान बाबा आशीर्वाद पाठीशी आहे हे इथे येताना जाणवत होतं. माझे बंधू महादेव जानकर यांच्याशिवाय माझा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. विजयादशमीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते, विजयादशमीला सीमोल्लंघन होत असतो. ही जबाबदारी खूप मोठी आहे. भगवान गडाकडे येताना गावोगावी माझं स्वागत केलं जात होतं. शेतकऱ्यांनी प्रेमानं फुलं देऊन भगवान बाबांना अर्पण करायला सांगितली हे पाहून माझं मन भरून आलं. लोकांच्या प्रेमानं मी भारावून गेले. ही लोक एवढी का प्रेम करतात, तेव्हा मागे वळून पाहिलं तर भगवान बाबांची

संबंधित बातम्या:

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

Pankaja Munde LIVE | दसरा मेळावा |जो दौड कर हरा नही सकते, वो तोड कर हराते है; पंकजा मुंडेचा घणाघात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *