इंग्लंडहून 11 जण अहमदनगरमध्ये, श्रींगोंदा, संगमनेरला प्रत्येकी 1 जण परतला, कोरोना रिपोर्टची प्रतीक्षा

अहमदनगर शहरातील 11 जण इंग्लंडहून भारतात परत आल्याची माहिती समोरी आली आहे. (11 citizens return from England to Ahmednagar)

इंग्लंडहून 11 जण अहमदनगरमध्ये, श्रींगोंदा, संगमनेरला प्रत्येकी 1 जण परतला, कोरोना रिपोर्टची प्रतीक्षा
7 डिसेंबरपासून 11 जण इंग्लडहून अहमदनगरला आले आहेत.
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 7:52 PM

अहमदनगर: इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरातील 11 जण इंग्लंडहून भारतात परत आल्याची माहिती आहे. 7 डिसेंबरपासून विविध ठिकाणी इंग्लंडहून 11 जण आल्याची माहिती समोर आलीय. इंग्लंडहून आलेल्या 11 पैकी 9 जण नगरला आले तर 2 जण मुबंईत थांबले आहेत, असं वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी म्हटलं. (11 citizens return from England to Ahmednagar)

इंग्लंडहून आलेल्या व्यक्ती पाच वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. अहमदनगरला आलेल्या व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यांच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली. इंग्लडहून नगरला आलेल्यांमध्ये मार्केटयार्डमधील 02, कराचीवालानगरमधील 04, गुलमोहोर रोडवरील 03, पाईपलाईनरोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एक, अशा एकूण 11 जणांचा यात समावेश आहे. संगमनेर आणि श्रीगोंदा येथील एक जणाचा समावेश असल्याचं समोर येत आहे.

अहमदनगरला इंग्लडहून आलेले प्रवासी हे 07, 09, 12, 14,21, 22 डिसेंबरला आले आहेत. अहमदनगरला गेल्या काही दिवसांत आलेल्या व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल कसे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

रत्नागिरीत लंडनहून 10 जण आले

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाची दहशत निर्माण झाल्याने भारतातही गेल्या काही दिवसात ब्रिटनमधून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. ही शोधाशोध सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरुन 10 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून मिळाली. तात्काळ या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला असून यापैकी 7 जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर 3 जण संगमेश्वर तालुक्यातील असल्याचं आढळून आलं आहे.

राज्य सरकारकडून SOP जारी

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने मिशन बिगिनिंग अगेन अंतर्गत नवीन अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार युरोप, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर करोनाची RTPCR टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला covid-19 च्या हॉस्पिटलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. तर निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशाला सात दिवस घरामध्ये होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

राज्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, जाणून घ्या नियम काय सांगतात

लंडनवरुन 10 जण रत्नागिरीत, अख्खं कोकण टेन्शनमध्ये

(11 citizens return from England to Ahmednagar)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.