भिवंडीत स्लॅब कोसळून 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी शहरातील एका दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल रात्री पदमानगर येथे घडली.

भिवंडीत स्लॅब कोसळून 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे : भिवंडी शहरातील एका दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल रात्री पदमानगर येथे घडली. या घटनेत आईसह एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या दोघींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साक्षी एनगुंदला असं मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.

भिवंडी शहरातील पदमानगर परीसरात गणेश टॉकीजजवळ गंगाजमुना ही तीस वर्ष जुनी तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत उमेश एनगुंदला याची पत्नी स्नेहा आणि दोन मुली मागील दोन वर्षांपासून भाड्याने राहत होते.

पती उमेश कामावर जाऊन आल्यावर रात्री उशीरा पर्यंत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत परीसरातच बसला होता. त्यावेळी घरात पत्नी स्नेहा मुलगी साक्षी (11) आणि प्रगती (8) या मुलींसोबत झोपली असता रात्री अकराच्या सुमारास अचानक घरातील स्लॅब कोसळला. यामध्ये प्लास्टरचा मोठा भाग मुलगी साक्षी हिच्या डोक्यात आणि छातीवर पडल्याने साक्षीचा मृत्यू झाला. साक्षी सहावीमध्ये शिकत होती. आई स्नेहा आणि बहीण प्रगती यांच्यावर कमी प्रमाणात प्लास्टर पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या असून या दोघींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दुर्घटनेबाबत विशेष म्हणजे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष आणि अग्निशामक दलास या घटनेची माहिती तीन तासानंतर समजली. त्यानंतर ते घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *