वय वर्षे 11, तब्बल 350 किमी घोडेस्वारी करत राजवीर सारंगखेड्यात दाखल

नंदुरबार : सारंगखेड्याचा घोडेबाजार ही अश्वप्रेमींसाठी पर्वणी असते. महाराष्ट्रच नाही, तर परराज्यातूनही लोक इथे येतात. अकोला जिल्ह्यातील 11 वर्षीय राजवीर सिंह या चेतक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी घोड्यावर 350 किमी अंतर पार करुन आलाय. सारंगखेड्यात राजवीरचं जंगी स्वागत करण्यात आलं. राजवीर सिंग नागरा 15 डिसेंबर रोजी आकोला येथून घोडा घेऊन सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी …

वय वर्षे 11, तब्बल 350 किमी घोडेस्वारी करत राजवीर सारंगखेड्यात दाखल

नंदुरबार : सारंगखेड्याचा घोडेबाजार ही अश्वप्रेमींसाठी पर्वणी असते. महाराष्ट्रच नाही, तर परराज्यातूनही लोक इथे येतात. अकोला जिल्ह्यातील 11 वर्षीय राजवीर सिंह या चेतक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी घोड्यावर 350 किमी अंतर पार करुन आलाय. सारंगखेड्यात राजवीरचं जंगी स्वागत करण्यात आलं.

राजवीर सिंग नागरा 15 डिसेंबर रोजी आकोला येथून घोडा घेऊन सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी निघाला होता. दररोज तो 50 किलोमीटर घोडेस्वारी करत सहा दिवसांच्या प्रवासानंतर आज त्याचं आगमन चेतक फेस्टिव्हलमध्ये झालं.

चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात राजवीरचं स्वागत करण्यात आलं. आपल्या मुलाने इतक्या लहान वयात 350 किलोमीटर घोडेस्वारी करत नवीन विक्रम प्रस्थापित केला हे पाहून त्याचे वडील सिम्रनजीत सिंग नागरा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

आपल्या मुलाच्या यशाविषयी आपल्याला अभिमान आहे. मुलांनी संगणक आणि मोबाईलसह इतर गोष्टींपासून दूर होऊन साहसी खेळांकडे वळायला हवं आणि आई वडिलांनी मुलांना प्रोत्साहान द्यावे. माझ्या मुलाचा हा विक्रम कोणीतरी मोडावा ही माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया राजवीरचे वडील नागरा यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *