मॉलमध्ये चोरीचा संशय, 12 तरुणांना अर्धनग्न करुन अमानुष मारहाण

मॉलमध्ये चोरीचा संशय, 12 तरुणांना अर्धनग्न करुन अमानुष मारहाण

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला गावात 12 युवकांना चोरीच्या संशयावरून अर्धनग्न करुन अमानुषपणे मारहाण करुण शिक्षा देण्यात आली. ही मारहाण मॉलच्या सुरक्षारक्षकांकडून करण्यात आली आहे. हे सर्व युवक त्याच परिसरातले असूनही भीतीपोटी या युवकांनी झालेल्या अत्याचाराची साधी तक्रारही दिली नाही. बुधवारी झालेल्या या अमानवी कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी ही घटना उघडकीस आली आहे. या घटने संदर्भात दहा सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

तुमसर तालुक्याच्या चिखला गावात मॅग्नीज इंडिया लिमिटेडची जगातील दुसरी सर्वात मोठी खाण आहे. या खाणीच्या परिसरात बुधवारी आठ तारखेला सकाळी चिखली येथील स्थानिक युवक सुरक्षारक्षकांना संशयास्पद स्थितीत आढळून आले. या मुलांवर चोरीचे आरोप लावत सुरक्षारक्षकांनी या बाराही युवकांना ताब्यात घेऊन सीता सावंगी येथील प्रशासकीय संकुलात आणले. त्यानंतर या प्रशासकीय इमारतीच्या समोरच 16 ते 30 वयोगटातील या 12 युवकांना डांबरी रस्त्यावर आणून, इनर वेअर सोडून सर्व कपडे काढायला लावले आणि यानंतर या सुरक्षारक्षकांनी या सर्वांवर अमानुष कृत्य करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर कोलांट्या मारायला लावल्या, हाताच्या कोपऱ्यांना त्या डांबरी रस्त्यावर चालायला लावलं, कान पकडून उठबस करायला लावली एवढेच नाही तर यापैकी काही सुरक्षारक्षकांनी शिव्या घालत त्यांना बूट घातलेल्या पायाने लाथा मारल्या आणि त्यांच्याकडून मी पुन्हा या परिसरात शिरणार नाही असं बोलायला लावलं, विशेष म्हणजे हा सर्व प्रकार त्यांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल करत लोकांना एक प्रकारे या परिसरात न येण्याची धमकी दिली.

एवढ्या सगळ्या प्रकारानंतर घाबरलेल्या या बारा मुलांनी पोलिसात तक्रार देण्याची हिंमत केली नाही. तसेच मॉल प्रशासनातर्फे चोरीची तक्रार देण्यात आली नसल्यामुळे पोलिसांनाही या घटनेची माहिती नाही.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिक चांगलेच संतापले, त्यानंतर समाजातील नेतेही या युवकांच्या मदतीला पुढे आले अर्धनग्न करून मारहाण झालेल्या लोकांमध्ये जीवन कोळवती, शिवणकर कोळवती, पंकज गोळे, विनोद गहाने, चेतन शिवणे, प्रकाश झोडे, उमेश सकरगडे, विनोद जागिर, अनिल केवट, संजय मेश्राम, गणेश शहारे, किशोर कुपाले अशी या पीडित मुलांची नावं आहेत.

या मुलांना विचारले असता, “आम्ही मॉइल परिसरात नाही तर वनपरिक्षेत्रात गेलो असतांना सुरक्षारक्षकांनी विनाकारण आम्हाला ताब्यात घेत आमच्यावर अमानुष अत्याचार केला असल्याचे त्यांनी सांगितले”.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *