भिवंडीत राजस्थान दिनानिमित्त तब्बल 1200 महिलांचा घुमर डान्स

भिवंडीमध्ये 1200 राजस्थानी महिलांनी घुमर नृत्य (rajasthan women ghumar dance) केले.

भिवंडीत राजस्थान दिनानिमित्त तब्बल 1200 महिलांचा घुमर डान्स
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 2:10 PM

भिवंडी : भिवंडीमध्ये 1200 राजस्थानी महिलांनी घुमर नृत्य (rajasthan women ghumar dance) केले. भिवंडीत राजस्थान महिला मंडळाकडून 30 मार्च रोजी घुमर महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून हे नृत्य करण्यात आले. घुमर हा राजस्थानमधील लोकप्रिय नृत्य (rajasthan women ghumar dance) प्रकार आहे.

राजस्थानी महिला मंडळाकडून 30 मार्च या राजस्थान दिनाच्या पूर्वसंध्येस 29 मार्च रोजी घुमर नृत्यू करत विश्व विक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत या नृत्याचा सराव करण्यात आला. हे नृत्य भिवंडी शहरातील चॅलेंज मैदान, गोकुळ नगर या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महिला मंडळाने जय्यत तयारी सुरु केली आहे.

या कार्यक्रमात भिवंडीसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, मीरा-भाईंदर, कर्जत, शहाड, अंबरनाथ, नवीमुंबई, मुलुंड, घाटकोपर येथील तब्बल 5 हजार महिल सहभागी होणार आहेत. तसेच एकत्रित घुमर नृत्य करुन विश्व विक्रम करणार असल्याचा मानस महिलांनी केला आहे, अशी माहिती अध्यक्षा प्रेम राठी यांनी दिली.

कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी महिलांनी घुमर नृत्याचे धडे गिरविण्यास सुरवात केली आहे. भिवंडी शहरातून या सोहळ्यात आतापर्यंत दोन हजार महिलांनी सहभाग घेतला असल्याची माहिती संघटन मंत्री कल्पना शर्मा यांनी दिली. याकरिता भिवंडीसह इतर ठिकाणी पाच दिवसांच्या एकूण 17 नृत्य प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या आहेत.

नुकतेच भिवंडी शहरातील महिलांनी एकत्रित नृत्याची तयारी आदर्श पार्क येथील नानानानी पार्क या उद्यान ठिकाणी आयोजित केली होती. त्यावेळी नृत्य प्रशिक्षक नागेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली 1200 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी तब्बल 35 मिनिटं तालबद्ध घुमर नृत्य सादर केले. गृहस्थ महिला लवकर संघटित होऊन एकत्र येत नाहीत हा भ्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून घालवून नारीशक्तीचे विराट रूप समाजासमोर दाखविण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे कल्पना शर्मा यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.