अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थीनीची कमी गुण मिळाल्याने आत्महत्या

वर्धा : बारावीत कमी गुण मिळाल्याने हताश होत विद्यार्थीनी हाताची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुलगावातून जाणाऱ्या महामार्ग परिसरात झुडपी जंगलात तिचा मृतदेह आढळला. समीक्षा बोकडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. समीक्षा बोकडे पुलगाव येथील आर. के. विद्यालयात बारावीत विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. तिला अधिकारी बनायचे होते. मात्र, 28 मे रोजी बारावीचा …

, अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थीनीची कमी गुण मिळाल्याने आत्महत्या

वर्धा : बारावीत कमी गुण मिळाल्याने हताश होत विद्यार्थीनी हाताची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुलगावातून जाणाऱ्या महामार्ग परिसरात झुडपी जंगलात तिचा मृतदेह आढळला. समीक्षा बोकडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

समीक्षा बोकडे पुलगाव येथील आर. के. विद्यालयात बारावीत विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. तिला अधिकारी बनायचे होते. मात्र, 28 मे रोजी बारावीचा निकाल लागला. यात समीक्षाला 52 टक्के गुण मिळाले. निकालानंतर ती हताश झाली.

आईला अॅडमिशनसाठी जात असल्याचे सांगत आत्महत्या

समीक्षा 30 मे रोजी दुपारी आपल्या आईला अॅडमिशनसाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी समिक्षा घरी आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तिचा शोध सुरू केला. सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेच दिसून आली नाही. अखेर शुक्रवारी पुलगाववरून जाणाऱ्या महामार्गाजवळच्या झुडपात तिचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली. यावेळी तिच्या डाव्या हाताची नस कापलेली आढळली. रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

दहावीत कठोर परिश्रम घेत 92 टक्के गुण

समीक्षाने दहावीत कठोर परिश्रम घेत 92 टक्के गुण मिळवले होते. यावेळी सुद्धा चांगले गुण मिळतील अशी आशा होती. मात्र, निकाल लागला आणि ती हिरमुसली. ती 55 टक्के मिळाल्याने प्रचंड निराश झाली. कुटुंबीयांनी तिला धीर दिला. ती एवढे टोकाचे पाऊल उचलेल असे कोणालाही वाटले नाही, अशी भावना कुटुबीयांनी व्यक्त केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *