बुलडाण्यात ट्रक आणि टाटा मॅजिकच्या अपघातात 13 जण जागीच ठार 

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूरमध्ये ट्रक आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 जण जागीच ठार झाले आहेत. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कारखान्यासमोर हा अपघात झाला. अपघातामध्ये 4 चाकी वाहनातील 13 जण जागीच ठार झाले. गाडीमध्ये 12 प्रवासी प्रवास करत होते. 12 प्रवाशांना प्रवास करण्याएवढी जागा नव्हती, तरिही …

बुलडाण्यात ट्रक आणि टाटा मॅजिकच्या अपघातात 13 जण जागीच ठार 

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूरमध्ये ट्रक आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 जण जागीच ठार झाले आहेत. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कारखान्यासमोर हा अपघात झाला.

अपघातामध्ये 4 चाकी वाहनातील 13 जण जागीच ठार झाले. गाडीमध्ये 12 प्रवासी प्रवास करत होते. 12 प्रवाशांना प्रवास करण्याएवढी जागा नव्हती, तरिही जबरदस्तीने प्रवासी गाडीत बसवण्यात आले होते, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. अपघातात 12 प्रवाशांसह चालकाचाही मृत्यू झाला. सर्व मृत अनुराबादला जात होते. अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळी धाव घेतली.

काही काळ ट्रॅफिकही जाम झाली होती. मात्र पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *