देवेन भारतींसह राज्यातील 19 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असताना, महाराष्ट्रातील 19 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यात मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पदोन्नती करण्यात आली असून, त्यांच्याकडे आता महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख करण्यात आले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन या बदल्या करण्यात …

देवेन भारतींसह राज्यातील 19 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असताना, महाराष्ट्रातील 19 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यात मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पदोन्नती करण्यात आली असून, त्यांच्याकडे आता महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख करण्यात आले आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्याचे राज्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पत्रकात म्हटले आहे. राज्याच्या राज्यपालांच्या आदेशाने या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आशुतोष के. डुम्बरे

आधी – सह पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई

आता – अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नती)

डॉ. सुखविंदर सिंह

आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन, मुंबई

आता – अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई (पदोन्नती)

देवेन भारती

आधी – सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई

आता – अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र, मुंबई (पदोन्नती)

अनुप कुमार सिंह

आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासन, मुंबई

आता – अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्यादित, मुंबई (पदोन्नती)

विनीत अग्रवाल

आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक

आता – अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई (पदोन्नती)

सुनील रामानंद

आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई

आता – अपर पोलीस महासंचालक, सुधार सेवा, पुणे (पदोन्नती)

डॉ. प्रज्ञा सरवदे

आधी – अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, मुंबई

आता – अपर पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई (बदली)

अतुलचंद्र कुलकर्णी

आधी – अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई

आता – अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे (बदली)

संजीव के. सिंघल

आधी – अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे

आता – अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, मुंबई (बदली)

प्रताप आर. दिघावकर

आधी – पोलीस उप महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

आता – विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध, महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नती)

मनोज एस. लोहिया

आधी – पोलीस उप महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई

आता – विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई (पदोन्नती)

दत्तात्रय यादव मंडलिक

आधी – पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे

आता – विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुन्हे अभिलेख कक्ष, पुणे (पदोन्नती)

केशव जी. पाटील

आधी – अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, ठाणे शहर

आता – विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण संचलनालय, मुंबई (पदोन्नती)

पी. व्ही. देशपांडे

आधी – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर

आता – संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्त प्रबोधिनी, पुणे (पदोन्नती)

कृष्ण प्रकाश

आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई

आता – विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासन, मुंबई (बदली)

संतोष रस्तोगी  

 आधी – सह पोलीस आयुक्त, प्रशासन, मुंबई

आता – सह पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई (बदली)

राजवर्धन

आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई

आता – सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई (बदली)

अमितेश कुमार

आधी – सह पोलीस आयुक्त, वाहतूक, मुंबई

आता – सह आयुक्त, गुप्तवार्ता, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई (बदली)

दीपक पाण्डेय

आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई

आता – विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई (बदली)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *