बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अमरावतीत 193 कोटींचा सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातील चांदूरबाजार तालुक्यातील राजुरा येथे लघु पाटबंधारे धरणात पाणी आणणे आणि उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याच्या प्रकल्पासाठीच्या 193 कोटी 81 लाख खर्चाच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालीय.

बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अमरावतीत 193 कोटींचा सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 2:18 PM

अमरावतीः जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अमरावतीत 193 कोटींचा सिंचन प्रकल्प होणार आहे. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातील चांदूरबाजार तालुक्यातील राजुरा येथे लघु पाटबंधारे धरणात पाणी आणणे आणि उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याच्या प्रकल्पासाठीच्या 193 कोटी 81 लाख खर्चाच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालीय. त्यामुळे दोन हजार हेक्टर शेतजमिनीचे सिंचन होणार असून, शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळालाय.

राजुरा प्रकल्पासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पाठपुरावा

सिंचन क्षमता वाढवून कृषी उत्पादकतेत भर पडण्यासाठी विविध सिंचन योजनांना जलसंपदा विभागाकडून चालना देण्यात येत आहे. याच अंतर्गत राजुरा प्रकल्पासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या क्षेत्रातील शेतकरी बांधवांना दोन हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पामुळे 2000 हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. बऱ्याच वर्षांपासून या रखडलेल्या प्रकल्पाचा पाठपुरावा केला जात होता, आता अडथळे दूर झालेत. दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार

सिंचन प्रकल्प नव्याने मजुरांत आणला गेल्याने आता शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण कोरडवाहू जमिनी आता सिंचनाखाली येणार आहे, त्यामुळे 12 महिने शेतकरी पिके घेऊ शकणार आहे, तसेच आता पाण्याची चिंता मिटल्याने परिसरातील शेतकरी आनंदित आहेत.

या प्रकल्पाने फायदा मिळेल, शेतकऱ्यांची भावना

बेलोरा येथील युवा शेतकरी भूषण देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केलाय. बच्चू कडू यांचे आभार, शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही घटना असून, माझ्या पाच एकर शेतात आधी पाण्याचा स्त्रोत नव्हता, आता मात्र या प्रकल्पाने फायदा मिळेल, असं शेतकरी देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

अमरावती एसटी डेपोतील स्तनपान कक्ष बंद; मंत्री यशोमती ठाकूर संतापल्या

जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधले, केंद्राकडून ओबीसींची शुद्ध फसवणूक, शरद पवारांचा हल्लाबोल

193 crore irrigation project in Amravati through the efforts of Bachchu Kadu, a great relief to the farmers

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.