राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, 8 महिन्यात 197 मृत्यू

सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी रोगराईने मात्र डोकं वर काढलं आहे. स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू यासारख्या दुर्धर आजारांनी नागरिकांना हैराण केलं आहे. स्वाईन फ्ल्यूने तर राज्यात 197 रुग्णांचा बळी घेतलाय. यात 33 रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आता स्वाईन फ्लूची भीती निर्माण झाली आहे.

राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, 8 महिन्यात 197 मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 29, 2019 | 4:24 PM

नाशिक : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी रोगराईने मात्र डोकं वर काढलं आहे. स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू यासारख्या दुर्धर आजारांनी नागरिकांना हैराण केलं आहे. स्वाईन फ्लूनं तर राज्यात 197 रुग्णांचा बळी घेतलाय. यात 33 रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आता स्वाईन फ्लूची भीती निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने थैमान घातले होते. पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहज करावा लागला. आताकुठे नागरिक यातून सावरताय तर आता रोगराईनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांनी करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वाईन फ्लू, डेंगू, मलेरिया यासारखे साथीचे आजार वाढू लागले आहेत. पावसात साचलेली डबकी, वाढलेली दुर्गंधी याला कारणीभूत ठरत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यात रुग्ण जास्त आढळले आहेत.

नाशिकमधील 33, नागपूरमधील 26, पुण्यातील 17, अहमदनगरमधील 16, कोल्हापूरमधील 9, ठाण्यातील 8 स्वाईन फ्लू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान राज्यात अशा एकूण 197 लोकांना आपला प्राण गमवावा लागला.

शासकीय रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी निखिल सैनदाने यांनी यावर काम सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या संदर्भात मागील काही दिवसांपूर्वी शासकीय रुग्णलयात विभागीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन स्वाईन फ्लूपासून बचाव करण्याबाबत आरोग्य विभागाला सुचना दिल्या आहेत.”

स्वाईन फ्ल्यू मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने याची लवकरात लवकर दखल घेणं गरजेचं आहे. गणपती उत्सवात देखील याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. याकडं होणारं दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं, असं मत सामाजिक कार्यकर्ते योगेश कापसे यांनी व्यक्त केलं.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.