शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांचेही मतदान

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या दहा ठिकाणी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण, ज्येष्ठ मंडळींसह 100 वर्षांवरील अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी मतदान केंद्रावर धाव घेतली. …

, शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांचेही मतदान

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या दहा ठिकाणी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण, ज्येष्ठ मंडळींसह 100 वर्षांवरील अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी मतदान केंद्रावर धाव घेतली.

प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे निवडणुकीपूर्वी सांगण्यात येते. यानुसार अचलपूरमध्ये राहणाऱ्या एक 105 वर्षाच्या आजीबाईनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. अंजानाबाई गणपत थोरात असे या 105 वर्षीय आजीबाईंचे नाव आहे. अंजानाबाईंनी अमरावतीमधील अचलपूर विधानसभा मतदारसंघात मतदान केले.

त्याशिवाय अकोला लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा क्षेत्रात मतदान पार पडत आहे. रिसोडजवळील ढोरखेडा येथे राहणाऱ्या एका 101 वर्षीय आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पिराजी भिकाजी वाळले असे या आजोबांचे नाव आहे. . ना काठीचा आधार, ना चष्मा, असलेल्या 101 वर्षीय वाळले आजोबांचे हे 17 वं मतदान आहे. तर एका ठिकाणी व्हिलचेअरवर बसून एक आजी मतदान करण्यासाठी दाखल झाल्या होत्या.

लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतंच. मात्र वयाची शंभरी पार केल्यानंतरही वयोवृद्ध व्यक्ती उत्साहाने मतदान करत आहे.

गेल्या काही वर्षांपासून लोकांना मतदानाचे महत्त्व पटत आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक घराबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करायला पाहिजे, असे मत या आजी-आजोबांनी व्यक्त केले.

लोककसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत, तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे.

पाहा व्हिडीओ : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *