Nashik Gold: 24 कॅरेट सोनं 48 हजार 750 वर

नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 250 रुपये नोंदवले गेले.

Nashik Gold: 24 कॅरेट सोनं 48 हजार 750 वर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 2:33 PM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 250 रुपये नोंदवले गेले.

नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 67000 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

BIS च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे.

अनेक दुकानदार ग्राहकांना कच्ची बिले किंवा तात्पुरती बिलेही देतात. तात्पुरते बिल हे असे असते जे व्यापाऱ्याने एखाद्या वस्तूच्या खरेदीवर ग्राहकाला दिलेले असते जे व्यापार्‍याच्या ऑडिट किंवा लेजरमध्ये दाखवले जात नाही. त्यामुळे तो कर भरणे टाळू शकतो. येथे ग्राहक विविध प्रकारचे कर (आता जीएसटी) भरण्याचेही टाळतो. तात्पुरत्या बिलामध्ये फक्त ज्वेलरी स्टोअरचे नाव (ज्यामधून दागिन्यांचा तुकडा खरेदी केला गेला आहे) आणि तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांची वस्तू दर्शवते. हे सहसा कोऱ्या कागदावर बनवले जाते. अशा व्यवहारातून काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे पक्क्या बिलात खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता, दागिन्यांचे नाव आणि कोड, तुम्ही किती सोन्यासाठी पैसे देत आहात. तसेच अतिरिक्त शुल्क जसे की मेकिंग आणि वेस्टेज चार्ज, ज्वेलर्सचा GST ओळख क्रमांक याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 67000 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन (24 carat gold at 48,750 in Nashik)

इतर बातम्याः

महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढली; नाशिकमध्ये 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार वर्ग

Good News: रानवाटेवर केशराचा पाऊस; भारतात दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे घडले दर्शन!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.