मोठी बातमी ! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे 29 रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोकंवर काढलं आहे (mucormycosis patients in new mumbai).

मोठी बातमी ! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे 29 रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
(प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 6:55 PM

मुंबई : कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोकंवर काढलं आहे. नवी मुंबईत या आजाराचे तब्बल 29 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या 29 रुग्णांपैकी 14 रुग्ण हे नवी मुंबई मनपा हद्दीतील आहेत. तर इतर 15 रुग्ण हे नवी मुंबई बाहेरचे आहेत. या रुग्णांपैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 3 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे (mucormycosis patients in new mumbai).

35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

संबंधित रुग्ण हे 10 मे नंतर आढळले आहेत. सर्व रुग्णांवर नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा प्रश्नासनाकडून करण्यात आला आहे (mucormycosis patients in new mumbai).

नवी मुंबईत कोणत्या भागात किती रुग्ण?

तेरणा – 10, MGM वाशी – 1, अपोलो – 9, रिलायन्स – 1, डी वाय पाटील – 5, हीरानंदनी फोर्टिस- 1, Mgm बेलापूर – 1

म्युकरमायकोसिस कोरोनापेक्षा भयंकर

कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना आता म्युकरमायकोसिस (mucormycosis) या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे आता अनेकजण कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते. ज्या कोरोना रुग्णांची प्रकृती अतिश्य गंभीर असेल किंवा ज्यांना एडस् आणि डायबेटीस यासारख्या सहव्याधी असतील त्या रुग्णांना कोरोना आणि म्युकरमायकोसिस एकाचवेळी होऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.

मात्र, सध्या भारतात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून हवेतूनही त्याचा प्रसार होऊ शकतो. सध्याच्या घडीला तरी याचा प्रसार रोखण्याचे तितकेसे प्रभावी मार्ग उपलब्ध नाहीत. केवळ योग्य वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

म्युकरमायकोसिसची लक्षणे कोणती?

* ताप * सर्दी * नाकातून सतत पाणी वाहणे * डोकेदुखी * श्वास घेताना त्रास जाणवणे

कोरोनासोबत तुम्हाला आणखी कोणत्या बुरशीजन्य आजारांची लागणही होऊ शकते?

कोरोनासोबत तुम्हाला आणखी काही बुरशीजन्य आजारांची लागण होऊ शकते. बुरशीजन्य आजाराचे साधारणत: एस्पेरगिलोसिस (Aspergillosis) आणि कॅनडिडायसिस (candidiasis) असे दोन प्रकार असतात. हवेतील बुरशी शरीरात गेल्यास या आजारांची बाधा होते.

एस्पेरगिलोसिस– एस्पेरगिलोसिस हा फुफ्फुसांचा आजार आहे. माती आणि झाडांवर आढळणारी बुरशी शरीरात गेल्यास या आजाराची लागण होऊ शकते.

इन्वासिव्ह कॅनडिडायसिस– कँडिडा बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. अँटीबायोटिक्स औषधे घेऊनही तुमचा ताप किंवा सर्दी जात नसेल तर तुम्हाला या आजाराची बाधा झाल्याची शक्यता आहे.

म्युकरमायकोसिस– हवेत असणाऱ्या काळ्या बुरशीमुळे या आजाराची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या किंवा सहव्याधी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता जास्त असते

संबंधित बातम्या:

Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?

अहमदनगरमध्ये कोरोनानंतर म्युकर मायकोसिसचं थैमान, तब्बल 61 जणांना संसर्ग, औषधांसाठी नातेवाईकांची वणवण

या लोकांसाठी ब्लॅक फंगस अधिक घातक, डोळ्यांची दृष्टी जाते, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.