ठाण्यात 3 सफाई कामगारांचा गुदमरुन मृत्यू

ठाणे : सफाई काम करताना ठाण्यात 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील ढोकाली नाका येथे 8 कामगार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP) सफाई करत होते. उर्वरित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाण्यातील ढोकाली नाका येथे असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सफाई काम करण्यासाठी 8 कामगारांना बोलावण्यात आले होते. हे सर्व सफाई काम …

ठाण्यात 3 सफाई कामगारांचा गुदमरुन मृत्यू

ठाणे : सफाई काम करताना ठाण्यात 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील ढोकाली नाका येथे 8 कामगार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP) सफाई करत होते. उर्वरित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाण्यातील ढोकाली नाका येथे असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सफाई काम करण्यासाठी 8 कामगारांना बोलावण्यात आले होते. हे सर्व सफाई काम करत असतानाच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. उर्वरित कामगारांना उपचारासाठी खासगी मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमित पुहल (20 वर्षे), अमन बादल (21 वर्षे), अजय बुंबाक (24 वर्षे), वीरेंद्र हातवाल (25 वर्षे), मनजीत वैद्य (25 वर्षे), जसबीर पुहल (24 वर्षे), अजय पुहल (21 वर्षे) रुमर पुहल (30 वर्षे) असे सफाई काम करणाऱ्या कामगारांची नावे आहेत. यापैकी अमित पुहल (20 वर्षे), अमन बादल (21 वर्षे), अजय बुंबाक (24 वर्षे)

वारंवार गुदमरुन मृत्यूनंतरही सफाई कामगारांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

वारंवार सफाई कामगारांचा काम करताना गुदमरुन मृत्यू होत असल्याच्या घटना घडतात. तरिही प्रशासन कामगारांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. कामगारांकडून सफाई काम करवून घेताना सुरक्षेचे सर्वच नियम धाब्यावर बसवले जात आहेत, असाही आरोप प्रशासनावर होत आहे. यावर न्यायालयानेही अनेकदा सरकारला फटकारले आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही, असेच दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *